माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यावर शिंदे गटाने सोपवली मोठी जबाबदारी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर, गंगापूर आणि कन्नड तालुक्यात सध्या शिंदे गट मोठ्या प्रमाणावर आपली ताकद वाढवत आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असून, या तिन्ही तालुक्यांसाठी ते आता लोकसभा प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने ऐनवेळी भाजपमधून आलेल्या दिनेशसिंह परदेशी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे चिकटगावकरांनी आपली ताकद शिंदे गटाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांच्यामागे उभी केली. मोठ्या मताधिक्क्याने बोरनारे विजयी झाले. चिकटगावकर हे वारकरी सांप्रदायाशी जोडले गेलेले आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग वैजापूर तालुक्यात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून २०१४ च्या मोदी लाटेत विजय मिळवलेले ते आमदार होते. २०१९ मध्ये वैजापूरमधील उमेदवारीसाठी काका-पुतण्यांमध्ये स्पर्धा होऊन कौटुंबिक कलह नको म्हणून सामंजस्याची भूमिका घेत भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी उमेदवारीवरील दावा सोडला आणि पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. मात्र तेलही गेले आणि तूपही गेले अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था झाली होती. अभय पाटील चिकटगावकर यांचा पराभव होऊन प्रा. बोरनारे विजयी झाले.

त्यानंतर भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्षांआधी ठाकरे गटात प्रवेश केला आणि निवडणुकीची तयारी सुरू केली. आ. अंबादास दानवे यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता, असे सांगण्यात येते. मात्र ऐनवेळी ठाकरे गटाने भाजपमधून उमेदवारीपुरते आलेल्या दिनेशसिंह परदेशी यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत सर्व ताकद प्रा. बोरनारे यांच्यासाठी वापरली.

ठाकरे गटाचा पराभव होण्यामागे हे मोठे कारण मानले जाते. कारण चिकटगावकर यांनी प्रा. बोरनारे यांना केवळ पाठिंबाच दिला नाही, तर त्यांचा प्रचारही केला. निवडणुकीनंतर चिकटगावकर यांनी शिंदे गटात प्रवेशही केला. आता त्यांना पक्षाने प्रभारी लोकसभा प्रमुख करून वैजापूर, गंगापूर, कन्नड या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारीही सोपवली आहे. यामुळे शिंदे गटाला बळ मिळणार आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software