- News
- जिल्हा न्यूज
- कापूस वेचत होती आई, शेताच्या कडेला झोक्यात चिमुकला खेळत होता, अचानक..., वैजापूर तालुक्यातील धक्कादाय...
कापूस वेचत होती आई, शेताच्या कडेला झोक्यात चिमुकला खेळत होता, अचानक..., वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेताच्या कडेला लिंबाच्या झाडाला बांधलेल्या झोक्यातून ३ वर्षीय चिमुकला गायब झाला आहे. त्याला कुणीतरी पळवल्याची शक्यता असून, त्याच्या आईने विरगाव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चिमुकल्याचा शोध सुरू केला आहे. ही घटना सोमवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी ३ च्या सुमारास वैजापूर तालुक्यातील शिरसगाव शिवारात घडली.
खांडीपिंपळगाव (ता. खुलताबाद) येथून १४ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खुलताबाद पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध मंगळवारी (१४ ऑक्टोबर) गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे. मुलगी मजुरी करणाऱ्या कुटुंबातील असून, ११ वीत शिकत होती. मंगळवारी पहाटे पाचला मुलगी घरात झोपलेली दिसली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी शोध सुरू केला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर खुलताबाद पोलिसांत वडिलांनी तक्रार दिली. तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 22:14:48
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...

