पैठणमध्ये पुन्हा खून?,  चालू महिन्यातच दुसरी घटना, आता डोके, छाती नसलेला अर्धा मृतदेह आढळल्याने खळबळ

सिल्लोडमध्येही आढळला महिलेचा मृतदेह

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणमध्ये चालू महिन्यातच खून झाल्याच्या शक्यतेचा दुसरा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आता आढळलेला मृतदेह अर्धा असून, डोके व छाती गायब आहे. सोमवारी (२२ डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास शहरापासून तीन किलोमीटरवर गोदावरी नदीच्या कडेला हा मृतदेह आढळला.

पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. गोदावरी नदीत काहीजण मासेमारी करत असताना त्यांना हा अर्धवट मृतदेह दिसला. मृतदेह तरुणाचा असण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी त्याला या ठिकाणी आणून टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. अंगातील पँटचा रंगही कळत नाही, अशी अवस्था मृतदेहाची आहे. पैठण पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.

खून झाल्याची दाट शक्यता आहे. हा मृतदेह कुणाचा, त्याला कुणी आणि कशासाठी मारले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चालू महिन्यातच गेल्या आठवड्यात पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील गोदावरी पुलाखाली कृष्णा पंढरीनाथ धनवडे (वय ३०, रा. गदेवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याचा गोणीत भरलेला मृतदेह आढळला होता. सागर रामेश्वर केसापुरे (वय २०, रा. देऊळगाव राजा), ऋषिकेश सखाराम गायकवाड (वय २२, रा. दुधड, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) आणि एक विधीसंघर्ष बालकाने हा खून करून मृतदेह आणून टाकल्याचे समोर आले होते. त्यानंतर आणखी एक खुनाच्या शक्यतेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

सिल्लोडमध्ये आढळला महिलेचा मृतदेह...
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे पुलाखालील पाण्यात चंद्रकलाबाई रामदास साळवे (वय ६५, रा. यशवंतनगर, सिल्लोड) यांचा मृतदेह मिळून आला. ही घटना सोमवारी (२२ डिसेंबर) दुपारी १२ च्या सुमारास समोर आली. याबाबत दुपारी २ वाजता सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या नातेवाइकांनी मृतावस्थेत चंद्रकलाबाईंना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software