खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या २ शाळकरी मुलांचा बुडून मृत्‍यू; गंगापूर तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारात आज, ११ ऑक्‍टोबरला दुपारी दोनच्या सुमारास घडली.

मयूर किशोर मोईन (वय १५) व साहिल संतोष झाल्टे (वय १६, रा. अंगुलगाव, ता. येवला, ह. मु. भगूर, ता. वैजापूर) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. दोघे महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होते. शनिवारी सहामाही पेपर दिल्यानंतर दोघे महालगावपासून काही अंतरावर असलेल्या नरहरी रांजणगाव शिवारातील उषा अग्रवाल यांच्या शेतातील बंद पडलेल्या खदाणीत पोहण्यासाठी उतरले. खदाणीच्या काठावर त्‍यांचे कपडे, पुस्तकांची बॅग आणि चपला गुरे चारणाऱ्यांना आढळल्या. ही बाब शेतकऱ्यांनी पोलिसांना कळवली. पोलिसांनी तत्‍काळ अग्‍निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्‍थळी येत दोन्ही मुलांना बाहेर काढले. दोघेही मृतावस्थेत आढळले.

मयूरच्या पश्चात आई, वडील, मोठी बहीण, आजी-आजोबा असा परिवार आहे, तर साहिलच्या पश्चात आई-वडील आहेत. साहिलची बहीण १० वर्षांपूर्वी दीड वर्षाची असताना जळून मृत्‍यू पावली होती. आता एकुलत्या एक साहिलचाही मृत्‍यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने, पोलीस अंमलदार विनोद बिघोत, तलाठी गणेश लोणे, पोलीस पाटील कडू म्हस्के उपस्थित होते. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी लक्ष्मण कोल्हे, जवान दिनेश मुंगसे, छत्रपती केकान, विशाल घरडे, प्रणाल सूर्यवंशी, सचिन शिंदे, मनसुबराव सपकाळ, वाहनचालक प्रशांत गायकवाड यांनी मृतदेह बाहेर काढण्याची कामगिरी केली. त्यांना अविनाश गलांडे, अमोल मलिक आणि मधुकर वालतुरे यांनी सहकार्य केले. अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software