छ. संभाजीनगर जिल्ह्यात अपघात वाढले : ४ महिन्यांच्या बाळाच्या आईसह २ तरुणांनी गमावला जीव; ९ जखमींची मृत्यूशी झुंज!, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर तालुक्‍यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, गेल्या दोन दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांनी जिल्ह्यात आणखी तीन जणांचा बळी घेतला. यात एका चार महिन्यांच्या बाळाच्या आईसह दोन तरुणांचा समावेश आहे. या अपघातांत ९ जण जखमी झाले असून, वेगवेगळ्या रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिल्लोड, गंगापूर, वैजापूर आणि वाघला फाटा या ठिकाणी हे अपघात झाले.

तेलगाव (ता. कन्नड) येथे दुपारी संदीप चव्हाण, त्यांची पत्नी निकिता व बहीण संगीता हे तिघे दुचाकीवरून जात असताना भरधाव पिकअपने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात चार महिन्यांच्या बाळाची आई असलेल्या निकिता (२१) यांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप व संगीता गंभीर जखमी झाले. या दोघांचीही सध्या छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत आमठाणा (ता. सिल्लोड) येथील तरुण व्यापारी नागेश भाग्यवंत (वय ३६) ट्रॅक्टरवर दुचाकी आदळून ठार झाले. भराडी येथील इरा शाळेजवळ ट्रॅक्टरने अचानक वळण घेतल्याने भाग्यवंत यांची दुचाकी या ट्रॅक्टरला धडकली होती. गंभीर जखमी अवस्थेतील भाग्यवंत यांची छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज चालली. मात्र, सोमवारी त्यांनी दम तोडला. वैजापूर - लाडगाव रस्त्यावर झालेल्या तिसऱ्या अपघाताने निमगाव (ता. वैजापूर) येथील सागर त्रिभुवन (२६) या तरुणाचा बळी घेतला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. 

९ जण जखमी 
या तीनसह आणखी दोन अपघातांत मिळून एकूण ९ जण जखमी झाले. गंगापूरच्या समतानगर भागात सोमवारी रात्री आयशर ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत चार महिला जखमी झाल्या. ज्योती जऱ्हाड (वय ३८), मीरा मोहिते (वय ५५), ताराबाई जाधव (वय ५६) व लता परमेश्वर (वय ४४, सर्व रा. समतानगर, गंगापूर) अशी या चौघींची नावे असून, सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर वैजापूर तालुक्यातील वाघला फाट्यावर सोमवारी रात्री आणखी एक अपघात झाला. येथे नादुरुस्तीमुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून आलेल्या ट्रॅवल्सच्या बसने धडक दिली. या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांची नावे मात्र कळू शकलेली नाहीत. यातील दोघे गंभीर जखमी आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना

Latest News

भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला जोरात धडक दिली. यात मायलेकी जखमी झाल्या. ही घटना छत्रपती...
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software