हुंदडत वळू आला, शिंगावर उचलून फेकले, ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू, तुर्काबाद खराडीची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूजजवळील तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथे वळूने अचानक वृद्धावर हल्ला करत शिंगाने उचलून दूर फेकले. यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (१३ नोव्‍हेंबर) सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.

महेताब अमीर शेख (वय ६५, रा. तुर्काबाद खराडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरून काठी टेकवत जात होते. त्याच वेळी गावळू हुंदडत आला. त्याने अचानक महेताब यांना शिंगावर उचलून दूर फेकले. महेताब यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. ग्रामस्थ, नातेवाइकांनी त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महेताब शेख यांचा मुलगा मोलमजुरीचे काम करतो. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, चार मुली, जावई, नातवंडे आहे. शुक्रवारी दुपारी एकला त्यांचा दफनविधी करण्यात आला. ज्या वळूने महेताब शेख यांचा बळी घेतला, तो यापूर्वी अनेकांवर धावून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software