- Marathi News
- जिल्हा न्यूज
- २३ वर्षांच्या तरुणाकडे गावठी कट्टा, दोन जीवंत काडतुसे, गंगापूर तालुक्यात मोठी कारवाई
२३ वर्षांच्या तरुणाकडे गावठी कट्टा, दोन जीवंत काडतुसे, गंगापूर तालुक्यात मोठी कारवाई

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : २३ वर्षीय तरुण गावठी कट्ट्यासह फिरत असल्याचे कळताच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देशवाडगाव (ता. गंगापूर) शिवारात त्याला पकडले. ही कारवाई शनिवारी (११ ऑक्टोबर) रात्री नऊला करण्यात आली. त्याच्याकडून गावठ्ठी कट्टा, दोन जीवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त करण्यात आली.
आकाश अशोक गागुंर्डे (वय २३, रा. वाहेगाव, ता. गंगापूर) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. वाहेगाव ते मुद्देशवाडगाव मार्गावर गावठी कट्टा घेऊन आकाश फिरत असल्याची माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेचच सापळा रचून मुद्देशवाडगाव शिवारात त्याच्यावर झडप घातली. झडतीत त्याच्या कमरेला गावठी कट्टा मिळून आला. त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस अंमलदार वाल्मीक निकम यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, अंमलदार वाल्मीक निकम, शिवानंद बनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, चालक संजय तांदळे यांच्या पथकाने केली.