नगरपालिका निवडणूक : सिल्लोडमध्ये बोगस मतदानावरून शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची, जिल्ह्यात ७५ टक्‍के मतदान

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिंदे गट आणि भाजपमधील आरोप-प्रत्‍यारोपांनी गाजलेल्या ६ नगरपालिकांच्या निवडणुकांत जिल्ह्यात मंगळवारी (२ डिसेंबर) सरासरी ७५.१९ टक्के मतदान झाले. १४ केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडल्याने काही काळ मतदान थांबले होते. सिल्लोड, गंगापूरमध्ये रात्री ८ पर्यंत मतदान चालले. बोगस मतदानाच्या संशयावरून सिल्लोडमध्ये शिंदे गट- भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची झाली. खुलताबादमध्ये सर्वाधिक ८२.२६ टक्के मतदान झाले. कन्नडमध्ये ७६.८३, सिल्लोडमध्ये ७४.५१, पैठणमध्ये ७३.७४, वैजापूरमध्ये ७३.३० आणि गंगापूरमध्ये ७१.७६ टक्‍के मतदान झाले.

सिल्लोडमध्ये शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांचे वाद
सिल्लोडमध्ये ८ मतदान केंद्रांवर बॅलेट युनिट बंद पडले होते. ते नादुरुस्त बॅलेट युनिट निवडणूक विभागाने अर्ध्या तासाच्या आत राखीव ठेवलेल्या यंत्रातून बदलले व मतदानप्रक्रिया सुरळीत झाली. प्रभाग ८ मध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते आणि भाजपचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या कार्यकर्त्यांत बोगस मतदान होत असल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून जमाव पांगवला. याशिवाय प्रभाग ८ मध्ये भाजप जिल्हा सचिव कमलेश कटारिया आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये खटके उडाले. प्रभाग ४ मध्येही भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर आणि शिंदे गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांत वाद झाला. याशिवाय प्रभाग ६ आणि १३ मध्येही कार्यकर्त्यांत किरकोळ बाचाबाची झाली. पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने किरकोळ वाद लगेच मिटविण्यात आले.

खुलताबादमध्ये बटन अडकल्याची अफवा
खुलताबादमध्ये प्रभाग ९ मधील चिश्तिया महाविद्यालयातील केंद्रात सकाळी ११ ला ईव्हीएम मशीनचे बटन अडकल्याची अफवा पसरली. तसा काही प्रकार घडला नव्हता, हे नंतर समोर आले. प्रभाग ४ आणि ९ मध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांत शाब्‍दिक खडाजंगी झाली. पैठणमध्येही ९ प्रभागांतील प्रत्‍येकी एका केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने १० मिनिटे मतदान थांबले होते. नवीन यंत्र बसवल्यावर ते सुरळीत सुरू झाले. कन्नडमध्येही एका मतदान केंद्रातील एक मतदान यंत्र बंद पडले होते. तासाभरात ते दुरुस्त करण्यात आले. फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक आता २० डिसेंबरला होणार आहे. वैजापूर, गंगापूरमधील प्रत्येकी २ आणि पैठणमधील ४ नगरसेवकपदाच्या निवडणुकाही २० डिसेंबरला होणार आहे.

ईव्हीएम मशीन सांभाळण्याच्या जबाबदारीने वाढले टेंशन
दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्याने आता २० दिवस मतदान यंत्रणे सांभाळाव्या लागणार असल्याने प्रशासनाचे टेंशन वाढले आहे. स्ट्राँग रूम परिसरात सीसीटीव्ही अधिक प्रमाणात बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे आणि साहित्य स्ट्राँग रूममध्ये जमा करून निवडणूक निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्र सील करण्यात आले. स्ट्राँग रूम केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ६ ठिकाणी स्ट्राँग रूम करून तेथे मतदान यंत्रे ठेवली आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर

Latest News

महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर महत्त्वाची बातमी : शेंद्रा ते बिडकीन अन्‌ बिडकीन ते ढोरेगाव... दोन नवे ग्रीनफिल्ड रस्ते वाढवणार इंडस्ट्रियल कनेक्टिव्हिटी, ७४४ कोटी मंजूर
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : करमाड (शेंद्रा) ते बिडकीन आणि बिडकीन ते ढोरेगाव या नवीन सहापदरी ग्रीनफिल्ड रस्त्यांसाठी सरकारने...
२६ वर्षीय तरुणीवर कारमध्ये जबरदस्ती शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न!; पुंडलिकनगर परिसरातील धक्कादायक घटना
शेतात गांजाचे पीक, कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, चिकलठाण्याजवळ रात्रीचा थरार
SRPF जवान ईव्हीएम मशीन बॅगेत भरून नेत असल्याच्या अफवेने खुलताबादमध्ये खळबळ!; रात्रीच शेकडो कार्यकर्ते धावले स्ट्राँग रूमकडे, नंतर समोर आले...
आता मेणबत्त्या नाही, बलात्काऱ्याला पेटवा, छत्रपती संभाजीनगरमध्ये जनतेचा आक्रोश, क्रांतीचौकातून निघाला भव्य मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software