- News
- जिल्हा न्यूज
- सिल्लोडची मर्डर केस : ९० एकर शेती, भुसार मालाचे मोठे व्यापारी, घरी ट्रॅक्टर, कार... खंडणी न मिळल्यान...
सिल्लोडची मर्डर केस : ९० एकर शेती, भुसार मालाचे मोठे व्यापारी, घरी ट्रॅक्टर, कार... खंडणी न मिळल्याने अपहरणकर्त्यांनी केली हत्या, ५ मारेकऱ्यांची नावे आली समोर...
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बोदवड (ता. सिल्लोड) येथील व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांच्या अपहरण नाट्याचा शेवट रक्तरंजीत झाला आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांना मारून चाळीसगाव घाटात मृतदेह फेकून दिला. अपहरणकर्त्या ५ जणांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार आज, २९ डिसेंबरला पहाटे समोर आला. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव- बोदवड रस्त्यावरून गव्हाण यांचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी गव्हाणे यांच्या मुलाला तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
अशी केली हत्या...
पैसे मिळण्यास उशीर होत असल्याने मारेकऱ्यांनी गव्हाणे यांना चाळीसगाव घाटातील म्हसोबा मंदिराजवळ नेत बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. नंतर त्यांचे हातपाय बांधून चाळीसगाव घाटात फेकून दिले. मारेकऱ्यांकडूक एक छर्ऱ्याचे पिस्तूल व चाकू जप्त करण्यात आला आहे. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
असे पकडले मारेकरी...
पोलिसांनी अपहरणकर्त्यांचे लोकेशन ट्रेस केले. ते छत्रपती संभाजीनगर शहरातील बसस्थानक, बाबा पेट्रोलपंप, टीव्ही सेंटर असे बदलत गेले. रविवारी रात्री ९ ला अपहरणकर्त्यांनी आम्हाला पैसे नकोत सांगत फोन बंद केला. त्यावेळी त्यांचे लोकेशन समृद्धी महामार्गावर टोलनाक्याजवळ दिसले. पोलिसांनी त्यांची कार अडवली आणि चौघांना ताब्यात घेतले. पाचवा संशयित दीपक जाधव हा त्यांना गावात राहून पोलिसांच्या हालचालींची माहिती देत होता. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली.

