४३ वर्षीय नराधमाचा १५ वर्षीय मुलीवर बलात्‍कार!; पैठण, छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेलवर तोडले लचके…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्नी आजारी असल्याचे सांगून मदतीसाठी नातेवाइक असलेल्या १५ वर्षीय मुलीला घरी बोलावून घेतले. मात्र ४३ वर्षीय नराधमाची या मुलीवरच नियत फिरली. तिच्याशी त्‍याने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्‍यानंतर पैठण, छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलवर तिला नेऊन तिच्या शरीराचे लचके तोडले. नराधमाला गुरुवारी (२ ऑगस्ट) रात्री पैठणच्या चिश्तिया कॉलनीत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्नी आजारी असल्याचे सांगून मदतीसाठी नातेवाइक असलेल्या १५ वर्षीय मुलीला घरी बोलावून घेतले. मात्र ४३ वर्षीय नराधमाची या मुलीवरच नियत फिरली. तिच्याशी त्‍याने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्‍यानंतर पैठण, छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलवर तिला नेऊन तिच्या शरीराचे लचके तोडले. नराधमाला गुरुवारी (२ ऑगस्ट) रात्री पैठणच्या चिश्तिया कॉलनीत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.

सय्यद खतीब (वय ४३, रा. चिश्तिया कॉलनी, पैठण) असे नराधमाचे नाव असून पैठण पोलिस ठाण्यात १६ जुलैला या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी झाला होता. तो पैठणला आल्याची गोपनीय माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी रात्री पावणेआठला त्‍याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी नराधमाने आरडाओरडा करून गोंधळ घालत पोलिसांनाच जीवे मारण्याची धमकी दिली.

मात्र पोलिसांनी त्‍याला न जुमानता त्‍याला अटक केली. त्‍याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल केला आहे. सय्यद खतीबने नात्यातील एका अल्पवयीन मुलीला पत्नी आजारी असल्याचे सांगून मदतीसाठी घरी बोलावून घेतले होते. महिनाभर त्याने मुलीवर बलात्‍कार केला. यादरम्यान पैठण, छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलवरही नेत तिचे लचके तोडले होते.

पैठणची दुसरी घटना : आधी गंदे इशारे, नंतर खाली पाडून अश्लील चाळे…
पैठणच्या पापानगर येथील ४५ वर्षीय महिलेकडे अश्लील इशारे करणाऱ्याविरुद्ध पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ती घरासमोर उभी असताना घरामागे राहणारा शयबाज रईस शेख हा तिला पाहून हाताने अश्लील इशारे करत होता. त्‍यामुळे ती त्याला म्हणाली, की तुम मेरे को ऐसे गंदे ईशारे क्यूं करते हो, मैं तुम्हारी उमर की हूँ क्या… असे विचारत महिला त्याच्या आई-वडिलांना सांगण्यासाठी त्याच्या घराकडे गेली असता त्याचे वडील रईस अमिर शेख व आई नजमा रईस शेख यांनी तिलाच शिवीगाळ केली.

तिला मला मारण्यासाठी अंगावर धावून आले. त्यामुळे महिला घराकडे पळत आली असता घरासमोर असताना शयबाजने तिला धरून खाली पाडत अश्लील चाळे केले व चापटबुक्‍क्यांनी मारहाण केली. त्याच्यापाठोपाठ तेथे रईस अमिर शेख, नजमा रईस शेख व लतिफ राज यांनी येऊन तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तेवढ्यात तिचे पती घरी आले. त्यांनी तिची सुटका केली. त्‍यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी शयबाज रईस शेख, रईस अमिर शेख, नजमा रईस शेख (सर्व रा. पापानगर पैठण) व लतिफ राज (रा. खोकडपुरा पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software