१३ वर्षांच्या खेळाडू मुलीवर बलात्‍कार करणाऱ्या नराधम शिवाजी गोर्डेच्या मुसक्या आवळल्या!; शेतात दडून बसला होता, पोलीस गेले तेव्हा आत्‍महत्‍येची तयारी करत होता…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खो-खोच्या १३ वर्षीय खेळाडू मुलीवर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनजवळील द पंजाब ग्रेट हॉटेलमध्ये बलात्‍कार करणारा नराधम प्रशिक्षक शिवाजी जगन्‍नाथ गोरडे (रा. बालानगर, ता. पैठण) याला वेदांतनगर पोलिसांनी बुधवारी (१६ ऑक्‍टोबर) रात्री अटक केली. तो गावाजवळीलच शेतात लपून बसला होता आणि आत्‍महत्‍येची तयारी करत होता. पोलिसांनी वेळीच त्‍याला ताब्‍यात घेतले. पोलीस निरीक्षक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खो-खोच्या १३ वर्षीय खेळाडू मुलीवर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनजवळील द पंजाब ग्रेट हॉटेलमध्ये बलात्‍कार करणारा नराधम प्रशिक्षक शिवाजी जगन्‍नाथ गोरडे (रा. बालानगर, ता. पैठण) याला वेदांतनगर पोलिसांनी बुधवारी (१६ ऑक्‍टोबर) रात्री अटक केली. तो गावाजवळीलच शेतात लपून बसला होता आणि आत्‍महत्‍येची तयारी करत होता. पोलिसांनी वेळीच त्‍याला ताब्‍यात घेतले.

पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी, वैभव मोरे, पोलीस अंमलदार बाळाराम चौरे, रंजूसिंग सुलाने, प्रवीण मुळे, शिवाजी गायकवाड यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. मंगळवारी रात्रीही शिवाजीच्या अटकेसाठी गावात पोलिसांनी धडक दिली होती. मात्र तो मिळून आला नव्हता. त्याला पोलीस शोधत असतानाच तो बालानगरजवळील एका शेतात लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. पथक गेले तेव्हा शिवाजी गळ्याला साडी बांधून झाडाला लटकून घेण्याच्या प्रयत्नात होता.

त्‍याआधीच पोलिसांनी त्‍याला पकडले. गळफास घेण्याच्या प्रयत्‍नात त्याच्या गळ्याला दुखापत झाली. त्यामुळे पैठणच्या सरकारी रुग्णालयात उपचार करून रात्री त्‍याला शहरात आणण्यात आले. ज्‍या हॉटेलमध्ये बलात्‍कार झाला, त्‍या द पंजाब ग्रेट हॉटेलची मालकीन पूजा रोहित राठोड व मॅनेजर सादिक मिर्झा बेग या दोघांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. शिवाजी सधन कुटुंबातील असून, विवाहित आहे. त्याला तीन अपत्ये आहेत. त्याचे दोन भाऊही शिक्षक आहेत. त्‍याच्या कृत्‍याने सारेच हादरून गेले आहेत. गावातही त्‍याच्याविरुद्ध प्रचंड संताप पसरला आहे.

घटनेची पार्श्वभूमी…
या प्रकरणात मुलीच्या ३८ वर्षीय आईने तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या १३ वर्षे १० महिने वयाच्या मुलीची खो- खो स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. ती महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणार आहे. २८ सप्टेंबरला गुजरातला सामना असल्याने शिवाजी गाेर्डे तिला २६ सप्टेंबरला मुंबईला घेऊन निघाला होता. उर्वरित खेळाडूही त्यांच्यासोबत येणार होते. दुपारी दोनला तो मुलीला घेऊन छत्रपती संभाजीनगरात आला. मुंबईला जाणारी रेल्वे रात्री दहाला असल्याचे सांगून त्याने रेल्वेस्टेशन परिसरातीलच द पंजाब ग्रेट हॉटेलवर आराम करण्याचे मुलीला सांगून तिला घेऊन हॉटेलमध्ये आला. तिथे एक रूम केली. रूममध्ये गेल्यावर मुलगी बेडवर बसलेली असताना त्याने तू मला आवडतेस. मी तुला आवडतो का? असे म्हणून तिच्यासोबत अश्लील कृत्‍य करण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला असता धमकावून तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्‍यामुळे मुलगी घाबरून गेली. त्यानंतर शिवाजी तिला बळजबरी गुजरातला घेऊन गेला. तिथे स्पर्धेत भाग घेतल्यानंतर दोघे परतले. मुलीने बदनामी आणि भीतीपोटी कुणाला काही सांगितले.

मात्र त्‍यानंतरही शिवाजी तिला पुन्हा शरीरसंबंधासाठी धमकावू लागला. तू आली नाही तर तुझी गावभर बदनामी करेल, अशी धमकी देऊ लागला. मैत्रिणीच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क करू लागला. त्याचा त्रास वाढतच चालल्याने मुलीने पालकांना हा प्रकार सांगितला होता. त्‍यानंतर पालक तिला घेऊन पैठण पोलीस ठाण्यात गेले. त्‍यांनी घटना वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडल्याचे सांगून छत्रपती संभाजीनगरला पाठवले होते. मंगळवारी तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तातडीने गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश दिले होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संगिता गिरी करीत आहेत. पीडित मुलीने यापूर्वी स्थानिक, आंतरजिल्हा, राज्‍यस्‍तरीय स्पर्धेत यश मिळवले आहे. त्‍यानंतर तिची निवड राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात झाली. गोरडे हाही राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल ‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बनावट नियुक्ती आदेश घेऊन घाटी रुग्णालयात नोकरीसाठी आलेल्या युवकाविरुद्ध बेगमपुरा पोलिसांनी मंगळवारी (१७ मार्च)...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!
कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software