हॉटेल प्रतीक रेस्टॉरंट ॲन्‍ड बारवर चोरट्यांचा डल्ला ; रोख रकमेसह दारूच्या बाटल्या लांबवल्या, दौलताबादजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधीसिरजगाव (ता. गंगापूर) येथील हॉटेल प्रतीक रेस्टॉरंट ॲन्‍ड बार फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दारूच्या बाटल्या लंपास केल्या. ही घटना मंगळवारी (५ नोव्‍हेंबर) सकाळी समोर आली. हॉटेल मालक प्रतीक संदिप सोनवणे (वय २४, रा. सिंधीसिरजगाव ता. गंगापूर) यांनी या प्रकरणात दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यांची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधीसिरजगाव (ता. गंगापूर) येथील हॉटेल प्रतीक रेस्टॉरंट ॲन्‍ड बार फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दारूच्या बाटल्या लंपास केल्या. ही घटना मंगळवारी (५ नोव्‍हेंबर) सकाळी समोर आली.

हॉटेल मालक प्रतीक संदिप सोनवणे (वय २४, रा. सिंधीसिरजगाव ता. गंगापूर) यांनी या प्रकरणात दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यांची सिंधीसिरजगाव येथे हॉटेल प्रतीक रेस्टॉरंट अॅण्ड बार आहे. ते आणि त्‍यांचे वडील मिळून हॉटेल चालवतात. सोमवारी (४ नोव्‍हेंबर) रात्री साडेअकराला त्‍यांनी हॉटेल बंद केली होती. हॉटेलचा मॅनेजर दत्तात्रय भगवानराव सोरगे हॉटेलमध्ये राहत असल्याने हॉटेलमध्ये मागील रूममध्ये झोपला. मागील चार-पाच दिवसांचे जमा झालेले ४१ हजार रुपये गल्ल्यातच होते.

मंगळवारी सकाळी साडेसातला प्रतीक यांना त्‍यांचा चुलतभाऊ नितीन गुलाबराव सोनवणे यांनी कॉल करून सांगितले, की तुझ्या हॉटेलचे दोन्ही शटर उघडे दिसत आहे. त्‍यामुळे प्रतीक आणि त्‍यांच्या वडिलांनी लगेच हॉटेलमध्ये येऊन पाहिले असता हॉटेलच्या तीन शटरपैकी दोन शटर उचकटलेले दिसले. काउंटरच्या लोखंडी दरवाजाला लावलेले कुलूप तोडलेले दिसले. गल्ल्यात ठेवलेले पैसे दिसून आले नाहीत. हॉटेलमध्ये मॅनेजर दत्तात्रय सोरगे याला बघितले असता तो नेहमी झोपतो तिथेच रुममध्येच झोपलेला होता. चोरट्यांनी रोख रकमेबरोबरच दारूही चोरून नेली. एकूण ६७ हजार ६९० रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. दौलताबाद पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रफीकखा पठाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला! छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्‍याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software