सिल्लोड भाजपचं हे काय चालू चोरी चोरी चुपके चुपके..!; बनकर अन्‌ सत्तारांतील लढाईला वेगळे वळण…!!, बातमीच्या शेवटी मुलतानी यांचं वक्‍तव्‍य वाचा, तुम्हालाही येईल सर्व अंदाज…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : सुरेश बनकर हे ठाकरे गटाचे उमेदवार असले तरी त्‍यांच्यामागे भाजपचे पदाधिकारी असल्याचे उमेदवारी अर्ज भरतानाही दिसून आले. सिल्लोड हा राज्‍यातील एकमेव मतदारसंघ ठरत आहे, जिथे ठाकरे गट आणि भाजपातील पदाधिकाऱ्यांत संघर्ष झडणार नसल्याचे दिसून येत आहे. याला कारण या मतदारसंघातील लढाई पक्षीय पातळीवर नव्हे तर वैयक्‍तीक पातळीवर लढली जात आहे. हो, […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : सुरेश बनकर हे ठाकरे गटाचे उमेदवार असले तरी त्‍यांच्यामागे भाजपचे पदाधिकारी असल्याचे उमेदवारी अर्ज भरतानाही दिसून आले. सिल्लोड हा राज्‍यातील एकमेव मतदारसंघ ठरत आहे, जिथे ठाकरे गट आणि भाजपातील पदाधिकाऱ्यांत संघर्ष झडणार नसल्याचे दिसून येत आहे. याला कारण या मतदारसंघातील लढाई पक्षीय पातळीवर नव्हे तर वैयक्‍तीक पातळीवर लढली जात आहे. हो, भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे उमेदवार अब्‍दुल सत्तार यांच्यातील राजकीय वैरत्‍व आता या पातळीवर पोहोचले आहे, की कोणत्‍याही परिस्थितीत पाडायचं म्‍हणजे पाडायचं… सत्तारांनी रावसाहेब दानवेंना लोकसभा निवडणुकीत पाडलं, त्यांचा ‘बिस्मिल्ला’ करून भोकरदनला बसवलं, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं ‘कल्याण’ करून दिल्लीला पाठवलं, आता त्‍याचाच वचपा काढणे सुरू आहे…

महायुतीत सिल्लोडची जागा शिंदे गटाला सुटल्याने सुरेश बनकर यांची उमेदवारीची इच्‍छा ठाकरे गटात जाऊन पूर्ण झाली. भाजपमधून बाहेर पडत त्‍यांनी शिवबंधन बांधले आणि आता सत्तारांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. याला रावसाहेब दानवे यांचे पाठबळ असल्याची चर्चा पूर्ण मतदारसंघात लपून राहिलेली नाही. बनकर यांनी सोमवारी (२८ ऑक्‍टोबर) दुपारी अडीचला रॅली न काढता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे रघुनाथ घरमोडे, रघुनाथ चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवाट, शेख फेरोज, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल ताठे हे होतेच पण भाजपचे पदाधिकारीही खुलेआम सोबत आले होते. ज्याप्रमाणे अब्दुल सत्तार यांनी लोकसभेत युतीचे काम केले त्याप्रमाणेच आम्ही इमानेइतबारे सिल्लोड येथील स्थानिक भाजप पदाधिकारी सत्तार यांचे काम करीत आहोत, असा टोला भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इदिस मुलतानी यांनी लगावल्याने एकूणच सिल्लोडचा राजरंग स्‍पष्ट झाला आहे.

अब्‍दुल सत्तार यांची मालमत्ता…
शिंदे गटाचे सिल्लोडचे उमेदवार अब्‍दुल सत्तार यांच्याकडे एकूण ६ कोटी ८५ लाख २७ हजार ६०१ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. बीए फर्स्ट इयरपर्यंत शिकलेल्या सत्तारांविरुद्ध एकूण ६ गुन्हे दाखल आहेत.
-५ कोटी ४३ हजार ६५१ रुपयांची जंगम मालमत्ता. १ कोटी ८४ लाख ८३ हजार ९५० रुपयांची स्थावर मालमत्ता.
-सत्तार यांच्या पत्नीच्या नावे ३ कोटी ९७ लाख २९ हजार ९३६ रुपयांची जंगम मालमत्ता. ४० लाख ६ हजार ७४० रुपयांची स्थावर मालमत्ता.
-सत्तार यांच्याकडे ३ लाख २० हजार रुपयांची शासकीय देणी असून, ३९ लाख ४९ हजार ३० रुपयांचे बँकेकडून कर्ज घेतले आहे.
-विविध बँकांमध्ये ६२ लाख २९ हजार ५७० रुपयांच्या ठेवी.
-त्यांच्याकडे ५ लाख ९० हजार ४१६ रुपयांची रोख रक्कम.
-१५ तोळे सोने असून, ७ लाख ९१ हजार ५८३ रुपयांचे हिरे.
-महिंद्रा इंटरप्राइजेस कंपनीत १२ लाख ५० हजार रुपयांचे, तर विविध सहकारी संस्थांमध्ये २६ हजार ७०५ रुपयांचे, एएस अजंता कन्स्ट्रक्शनमध्ये २ कोटी ५५ लाख ९२ हजार ८०१ रुपयांचे शेअर्स आहेत.
-एक इनोव्हा कार आहे.
-२०२३-२४ चे एकूण उत्पन्न ९४ लाख ९५ हजार ४५६ रुपये.

सुरेश बनकर यांची मालमत्ता २ कोटींची…
सिल्लोडचे ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांच्यासह पत्नीकडे २ कोटी ५ लाख ७२ हजार ६६९ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. रोख २ लाख रुपये, विविध बँकांमध्ये १२ लाख १३ हजार २२४ रुपये फिक्स डिपॉझिट, शेअर्समध्ये २ लाख २८ हजार ५०५ रुपयांची गुंतवणूक, एलआयसीत ११ लाख ८२ हजार ७२७ रुपयांची गुंतवणूक, तीन लाखांचे चार तोळे सोनेही त्‍यांच्याकडे आहे. विविध बँकांचे १६ लाख ११ हजार ८३३ रुपये त्यांच्याकडे कर्ज आहे. त्यांच्या पत्नी अनिता यांच्या नावे एक कोटी सात लाख १७ हजार ९२४ रुपयांची मालमता आहे. यात तीन लाख रुपये रोख, १८ लाख ४३ हजार ६०२ रुपयांचे फिक्स डिपॉझिट, १ लाख ७ हजार ५०० रुपयांचे शेअर्स, एलआयसीत १ लाख २२ हजार १७० रुपयांची गुंतवणूक, नावावर एक ट्रॅक्टर, ११ लाखांचे १५ तोळे सोने यांचा समावेश आहे. ४० लाख ४६ हजार ८०० रुपयांचे त्यांच्या नावावर कर्ज आहे. बनकर यांच्या विरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. त्यात रास्ता रोको आंदोलन करणे, जमाव जमवणे अशा दखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. सिल्लोड न्यायालयात दोन, तर इंदौर न्यायालयात त्यांच्यावर दोन खटले सुरू आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software