विहिरीत पडून १८ वर्षीय तरुणीचा मृत्‍यू, वैजापूर तालुक्‍यातील जरूळची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील जरूळ येथे शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास पाय घसरून विहिरीत पडल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. पूजा बाबासाहेब मतसागर (रा. जरूळ) असे या तरुणीचे नाव आहे. पूजा जरूळ शिवारातील गट नंबर ९६ मधील विहिरीवर पाणी आणायला गेली होती. पाणी शेंदत असताना पाय घसरून विहिरीत पडली. बुडून तिचा मृत्यू […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील जरूळ येथे शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास पाय घसरून विहिरीत पडल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. पूजा बाबासाहेब मतसागर (रा. जरूळ) असे या तरुणीचे नाव आहे.

पूजा जरूळ शिवारातील गट नंबर ९६ मधील विहिरीवर पाणी आणायला गेली होती. पाणी शेंदत असताना पाय घसरून विहिरीत पडली. बुडून तिचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी तिला विहिरीतून काढून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्‍यात देण्यात आला. या प्रकरणी पोलिस पाटील अनिता सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. तपास पोलीस अंमलदार संतोष पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software