विजेच्या तारांना स्‍पर्श होऊन शेतकऱ्याचा जागीच मृत्‍यू, फुलंब्रीच्या वडोद बाजार येथील हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा बळी गेला आहे. शेतात शेळ्या चारत असताना तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श होऊन लक्ष्मण काळू म्हस्के (वय ६४, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री) यांचा जागीच मृत्‍यू झाला. एका शेळीही विजेचा धक्का बसून दगावली. ही घटना वडोद बाजार शिवारात शुक्रवारी (६ डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास घडली. लक्ष्मण म्हस्के शेतीसोबत […]

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा बळी गेला आहे. शेतात शेळ्या चारत असताना तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श होऊन लक्ष्मण काळू म्हस्के (वय ६४, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री) यांचा जागीच मृत्‍यू झाला. एका शेळीही विजेचा धक्का बसून दगावली. ही घटना वडोद बाजार शिवारात शुक्रवारी (६ डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

लक्ष्मण म्हस्के शेतीसोबत शेळीपालन करतात. नेहमीप्रमाणे ते १५ शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या गिरीजा नदीच्या काठावर गेले होते. त्या ठिकाणी विद्युत प्रवाहित तारा तुटून पडलेल्या आहेत. एका शेळीला या तारांचा स्पर्श होऊन ती जागीच दगावली. शेळीला अचानक काय झाले हे पहायला गेलेल्या लक्ष्मण यांनी शेळीला स्पर्श करताच तेसुद्धा तारेला चिकटले. त्यांचाही जागीच मृत्यू झाला. सायंकाळी शेळ्या घरी आल्या. मात्र लक्ष्मण म्‍हस्के न दिसल्याने कुटुंबीयांनी गाव शिवारात शोध सुरू केला. विजेच्या धक्‍क्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाल्याचे समोर आले.

पाथ्री येथील महावितरण कार्यालयाला कळवल्यानंतर विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. त्‍यानंतर म्‍हस्के यांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रात्री आठला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे महाविरणाच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्‍त होत आहे. वडोदबाजार येथील स्मशानभूमीपासून काही अंतरावरील शेतवस्तीवर या विद्युत तारेद्वारे वीज पुरवठा केला जातो. शुक्रवारी पहाटे वादळवाऱ्यासह पावसामुळे या तारा तुटून पडल्याचे सांगण्यात आले. वेळीच महावितरणने धाव घेऊन दुरुस्ती केली असती तर लक्ष्मण म्‍हस्के यांचे प्राण गेले नसते, अशा भावना व्यक्‍त होत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software