भरधाव दुचाकी पुलावरून कोसळली, युवकाचा जागीच मृत्‍यू, मागे बसलेला मुलगा गंभीर जखमी, सिल्लोडजवळील दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव दुचाकी पुलावरून कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना जळगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील निल्लोड फाट्याजवळ बुधवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सय्यद जाकेर सय्यद रफीक (वय ३२, रा. गेवराई, जि. बीड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तो ईमरान अशरफखा पठाण (वय १५) याच्यासह […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव दुचाकी पुलावरून कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना जळगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील निल्लोड फाट्याजवळ बुधवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

सय्यद जाकेर सय्यद रफीक (वय ३२, रा. गेवराई, जि. बीड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तो ईमरान अशरफखा पठाण (वय १५) याच्यासह छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकीने (क्र. एमएच २०, एफएल ९६३४) तांडा बाजार येथील एका लग्नसमारंभाला येत होते. मात्र निल्लोड फाट्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून त्यांची दुचाकी पुलावरून कोसळली. सय्यदचा जागीच मृत्यू तर इमरान पठाण गंभीर जखमी झाला. दोघांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी आणले. सय्यदच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software