भरधाव टिप्परने दुचाकीला मागून उडवले, तरुणाचा मृत्‍यू, फर्दापूरजवळील दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फर्दापूर, ता. सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव टिप्परने दुचाकीला मागून धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात रविवारी (६ ऑक्‍टोबर) सकाळी मृत्‍यू झाला. हा अपघात शनिवारी (५ ऑक्‍टोबर) दुपारी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील फर्दापूरजवळ परिसरात झाला. आदित्य संजय डापके (वय १९, रा. अन्वी, ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव […]

फर्दापूर, ता. सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव टिप्परने दुचाकीला मागून धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात रविवारी (६ ऑक्‍टोबर) सकाळी मृत्‍यू झाला. हा अपघात शनिवारी (५ ऑक्‍टोबर) दुपारी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील फर्दापूरजवळ परिसरात झाला.

आदित्य संजय डापके (वय १९, रा. अन्वी, ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. आदित्य दुचाकीने (क्र. एमएच २० ईडब्ल्यू ६७४५) जळगावकडे जात होता. फर्दापूरजवळील राजकुंवर महाविद्यालय परिसरात मागून भरधाव टिप्परने (क्र. एमएच १२ एसएक्स ३७२६) त्याला उडवले. डोक्याला मार लागून आदित्य गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर टिप्परचालक फरारी झाला. पोलिसांनी टिप्पर जप्त केला आहे. अजिंठा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software