पतीने डिझेल उधारीचे सव्वा लाख रुपये थकवले, पेट्रोलपंप मालक-व्यवस्थापक घरी आले… विवाहितेला मनस्ताप होऊन केली आत्‍महत्‍या!, वैजापूरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ट्रकमध्ये १ लाख ३८ हजार रुपयांचे डिझेल भरून घेतल्यानंतर रक्‍कम मोठ्या प्रमाणावर थकल्याने पेट्रोलपंपाचे मालक आणि व्यवस्थापक हे ट्रकमालकाकडे पैसे मागायला गेले. त्‍यामुळे मनस्ताप होऊन ट्रकमालकाच्या पत्‍नीने विष घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना वैजापूर तालुक्‍यातील हाजीपूरवाडी येथे घडली. पैसे मागितल्याने मनस्ताप होऊन आपल्या पत्‍नीने आत्‍महत्‍या केल्याची तक्रार ट्रकमालकाने शिऊर पोलीस ठाण्यात […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ट्रकमध्ये १ लाख ३८ हजार रुपयांचे डिझेल भरून घेतल्यानंतर रक्‍कम मोठ्या प्रमाणावर थकल्याने पेट्रोलपंपाचे मालक आणि व्यवस्थापक हे ट्रकमालकाकडे पैसे मागायला गेले. त्‍यामुळे मनस्ताप होऊन ट्रकमालकाच्या पत्‍नीने विष घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना वैजापूर तालुक्‍यातील हाजीपूरवाडी येथे घडली. पैसे मागितल्याने मनस्ताप होऊन आपल्या पत्‍नीने आत्‍महत्‍या केल्याची तक्रार ट्रकमालकाने शिऊर पोलीस ठाण्यात केली. त्‍यावरून पोलिसांनी पेट्रोलपंप मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे. कविता शांतीलाल सुलाने (वय ३५, रा. हाजीपूरवाडी) असे आत्‍महत्‍या केलेल्या महिलेचे नाव आहे.

काय आहे प्रकरण…
हाजीपूरवाडी येथील शांतिलाल उत्तम सुलाने यांच्याकडे ट्रक(क्र. एमएच २१ बीएच ७०६१) आहे. त्यांनी त्‍यांच्या ट्रकसाठी वैजापूर येथील दाक्षायणी पेट्रोलपंपातून नोव्हेंबर २०२२ पासून १ लाख ३८ हजार रुपयांचे डिझेल उधारीवर घेतले होते. मात्र वेळेत उधारी न फेडल्याने ती मोठ्या प्रमाणावर थकली. त्‍यामुळे डिझेल देणे बंद करून पेट्रोलपंपाचे मालक अनिकेत चेळेकर आणि व्यवस्थापक सुरज आव्हाळे यांनी सुलाने यांच्याकडे पैसे मागितले. आठ महिन्यांपासून ट्रक बंद असून, ट्रक विक्रीचा व्यवहार सुरू आहे. ट्रक विकला की उधारीचे पैसे देतो, असे सुलाने यांनी चेळेकर यांना सांगितले. मात्र आजवर सुलाने यांनी ना ट्रक विकला, ना उधारी दिली. त्‍यामुळे ९ ऑगस्टला चेळेकर व आव्हाळे हे सुलाने यांच्या घरी गेले. त्यावेळी सुलाने घरी नव्हते. त्‍यांनी सुलाने यांच्या पत्नी कविता यांच्याकडे थकलेल्या उधारीबद्दल सांगितले.

विवाहितेला मनस्ताप सहन झाला नाही…
डिझेलपोटी सुलाने यांनी थकवलेल्या पैशांमुळे पेट्रोलपंपमालक आणि व्यवस्थापकांनी घरापर्यंत येऊन उद्वेग व्यक्‍त केल्यामुळे कविता यांना मनस्ताप झाला. त्‍यांनी विष घेऊन आत्‍महत्‍या केली. त्यांना सुलाने यांनी कोपरगावच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान ११ ऑगस्टला सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्‍यानंतर कविता यांच्या मृत्यूला पेट्रोलपंप मालक अनिकेत चेळेकर व व्यवस्थापक सूरज आव्हाळे हेच जबाबदार असल्याची तक्रार रविवारी सुलाने यांनी शिऊर पोलिसांत केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. रणखांब करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड

Latest News

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपने अनिल मकरिये यांना बुधवारी (११ मार्च) उमेदवारी जाहीर...
अवघे छत्रपती संभाजीनगर शहरच ‘गॅस’वर!; घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई, ९२१ रुपयांचा सिलिंडर २ हजार रुपयांनी विकताहेत विक्रेते, प्रशासनाचे दावे फोल, दावे करण्यापेक्षा आता थेट टीम बनवून छापे मारा... शहरवासियांची मागणी!!
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software