धबधब्याखाली अंघोळ करताना पाय घसरून कुंडात पडल्याने तरुणाचा मृत्यू, सोयगावच्या धारकुंड धारेश्वर येथील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा ) : सोयगावजवळील धारेश्वर (धारकुंड) येथील धबधब्याखाली अंघोळ करत असताना पाय घसरून कुंडात पडल्याने एका तरुण भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२६ ऑगस्ट) दुपारी एक वाजता घडली. गजानन राघु माने ( वय ३५, रा. केऱ्हाळा ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्या नाव आहे. श्रावण सोमवारनिमित्ताने गजानन दर्शनासाठी आला होता. दर्शनाआधीच त्याचा कुंडात बुडून […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा ) : सोयगावजवळील धारेश्वर (धारकुंड) येथील धबधब्याखाली अंघोळ करत असताना पाय घसरून कुंडात पडल्याने एका तरुण भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२६ ऑगस्ट) दुपारी एक वाजता घडली.

गजानन राघु माने ( वय ३५, रा. केऱ्हाळा ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्या नाव आहे. श्रावण सोमवारनिमित्ताने गजानन दर्शनासाठी आला होता. दर्शनाआधीच त्याचा कुंडात बुडून मृत्यू झाला. धारकुंड धारेश्वर महादेवाचे तीर्थक्षेत्र असून, येथे तीनशे फुटांवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत असतो. अत्यंत घनदाट जंगलात हे धार्मिक स्थळ आहे. पायवाटेद्वारे येथे पर्यटक, भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. श्रावण सोमवार असल्याने केऱ्हाळा येथील गजानन हा चार-पाच मित्रांसोबत आला होता. येथे आल्यावर तीनशे फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली अंघोळ करण्यास गजानन व त्‍याचे मित्र गेले. अंघोळ करताना गजाननचा पाय घसरला व तेथील मोठ्या कुंडात जाऊन पडला. येथील कुंडास मोठमोठ्या कपारी असल्याने गजानन पाण्यात दिसला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, विकास दुबेले घटनास्थळी पोहोचले. तेथे काही पट्टेदार पोहणाऱ्यांनी सायंकाळी पाचला गजाननचा मृतदेह बाहेर काढला. गजाननच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. गजानन वाहन चालवून उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे सिल्लोड परिसरात तो परिचित होता.

धारकुंड (धारेश्वर ) येथील कुंड बनले धोकादायक…
धारकुंड धारेश्वर येथील धबधब्‍याखाली असलेल्‍या कुंडास मोठमोठ्या कपारी असून पाय घसरून भाविक पडण्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. श्रावण महिन्यात दरवर्षी तीन ते चार तरुणांचा मृत्यू होताे. पहिल्याच श्रावण सोमवारी जळगाव येथील गौरव किसण नेरकर (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून येथील धोकादायक कुंडास जाळी बसविण्याची मागणी असताना प्रशासनाने अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढतच असून, पैठण आणि कन्नड तालुक्यात आणखी दोन...
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software