तक्रार निवारण दिवस, दिवसभर चालले कामकाज

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये 22 जुलै) हा दिवस तक्रार निवारण दिवस म्हणून पाळण्यात आला. यानिमित्त नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयामध्ये दिवसभर कामकाज सुरु होते. जिल्ह्यातील सर्व तहसील, उपविभागीय कार्यालयामध्ये नागरिकांची उपस्थिती होती. तक्रार निवारण दिनात शी नागरिकांना समक्ष बोलावून त्यांच्या समोर तात्काळ निपटारा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये 22 जुलै) हा दिवस तक्रार निवारण दिवस म्हणून पाळण्यात आला. यानिमित्त नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयामध्ये दिवसभर कामकाज सुरु होते. जिल्ह्यातील सर्व तहसील, उपविभागीय कार्यालयामध्ये नागरिकांची उपस्थिती होती. तक्रार निवारण दिनात शी नागरिकांना समक्ष बोलावून त्यांच्या समोर तात्काळ निपटारा करण्यात आला.

वैजापूर तहसील कार्यालयात 23 नागरिक, कन्नड तहसिल कार्यालयात 35 नागरिक हजर होते त्यातील 27 प्रकरणावर जागेवर निकाल देऊन प्रकरण निकाली काढण्यात आले. उपविभागीय कार्यालय कन्नड येथे भूसंपादन विषयक प्रमाणपत्र निर्गमित केले तसेच जात / 23 NCL : निर्गमित करण्यात आले 3 प्रकरणे सिंचन विहीर गटविकास अधिकारी यांचेशी संबंधित होते यामध्ये गटविकास अधिकारी यांचेशी चर्चा करून तेही निकाली काढण्यात गेली. 1 प्रकरण मुख्याधिकारी यांचेशी संबंधित होते ते ही निकाली काढण्यात आले. इतर प्रकरणे अपीलची होती. तसेच काही प्रकरण अर्धन्यायिक असल्याने प्रकरण नोंद करुन घेतली. खुलताबाद तहसिल कार्यालयात 11 तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

सिल्लोड तहसील कार्यालयात एकूण 12 तक्रारदार हजर होते. त्यांचे अर्ज घेऊन त्यांच्ये कामकाजविषयीं समाधान करण्यात आले आले.तक्रार निवारण दिवस अंतर्गत उपविभागीय कार्यालय पैठण- फुलंब्री येथे 15 नागरिकांना जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. 7 तक्रारी भूसंपादन संदर्भातल्या निकाली काढण्यात आल्या. इतर 4 तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये आज एकूण 42 नागरिकांनी तक्रार निवारण दिनात तक्रारी मांडल्या होत्या. त्यापैकी पाच तक्रारी या सातबारा संबंधी होत्या त्या संबंधित तलाठ्याला बोलून त्यांची तक्रार निवारण करण्यात आली. काही तक्रारी रेशन कार्ड संबंधी होत्या त्या ऑनलाईन असल्याने सहा तक्रारी रेशन कार्ड देऊन निकाली काढल्या. इतर तक्रारी संजय गांधी निराधार योजने सबंधी व रस्त्यासंबंधी होत्या.

महसुल शाखेतील एकूण 332 प्राप्त तक्रारीत 172 तक्रारीच निराकरण करण्यात आले. शिल्ल्क तक्रारीत 5 रस्ते प्रकरण स्थळी पाहणी नोटिस काढल्या. 3 तडजोड आधारे प्रकरणे निकाली काढण्यात आले. 169 प्रकरणात तहसिलदार स्तरावर मंजुरी देऊन समाविष्ट तयार करण्यासाठी Login ला पाठवण्यात आले आहे.

पुरवठा विभागाच्या 11 प्राप्त तक्रारीत 11 निराकरण करण्यात आल्या, रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना 33 प्राप्त तक्रारी 18 तक्रारीचे निराकरण करण्यात आल्या. 18 प्रकरणात अनुदान वाटप झाले आहे. 15 प्रकरण नविन असून 29 जुलै 2024 रोजी बैठक ठेवण्यात आली आहे. त्यात निर्णय घेण्यात येणार आहे. संकीर्ण शाखेत सततच्या पावसाचे अनुदान प्राप्त नसल्याचे तक्रारी निराकरण 42 तक्रारी VK नंबर जनरेट करण्याबाबत मंत्रालयात पाठपुरावा केला आहे.

त्याही तक्रारीची नोंद घेऊन स्थळ पाहणीसाठी साठी ठेवण्यात आलेले आहेत.

फुलंब्री तहसिल कार्यालयात 12 पैकी 11 तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

सोयगाव तहसील कार्यालयात एकूण 25 तक्रारी नोंदवल्या गेल्या. पैकी 17 तक्रारीचे निवारण करण्यात आले.

गंगापूर तहसील कार्यालयात 33 नागरिक तक्रार निवारण दिवसात उपस्थित होते. तक्रार निवारण दिनात सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करुन महसुल प्रशासनाने दिलासा देण्याचे काम केले आहे.

जिल्हाभरात विविध कार्यालयामध्ये तक्रार निवारण दिनानिमित्त तक्रारीचे निवारण करण्यात आले,असे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software