गायके मामानं कमालच केली…ओळख वाढवून तिच्या घरी गेला, पती नसल्याचे पाहून केले अश्लील चाळे!, वैजापूरची खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ४४ वर्षीय महिलेच्या घरी जात, घरात तिचा पती व मुलगा नसल्याचे पाहून गायके मामाची विकृती उफाळून आली. त्‍याने तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची तक्रार महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात केली आहे. सुरेगाव (ता. येवला, जि. नाशिक) येथील गायके मामा नावाच्या व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वैजापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेच्या बसवर […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ४४ वर्षीय महिलेच्या घरी जात, घरात तिचा पती व मुलगा नसल्याचे पाहून गायके मामाची विकृती उफाळून आली. त्‍याने तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची तक्रार महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात केली आहे. सुरेगाव (ता. येवला, जि. नाशिक) येथील गायके मामा नावाच्या व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वैजापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेच्या बसवर चालक आहे.

तक्रारदार ४४ वर्षीय महिला २०२१ साली वैजापूर शहरातील एका खासगी शाळेत मावशी म्हणून काम करत होती. पगार कमी असल्याने तिने मे २०२४ रोजी ते काम सोडले. गायके मामाकडे तिने समता इंटरनॅशनल स्‍कूलमध्ये मावशी म्हणून काम मिळेल का?, अशी विचारणा केली होती. त्‍यावेळी त्‍याने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले होते. त्‍यानंतर २८ नोव्हेंबर रोजी तो महिलेच्या घरी आला. तिचा पती व मुलगा घरात नसल्याचे पाहून त्‍याने महिलेसोबत अश्लील चाळे केले. महिलेने वैजापूर पोलीस ठाणे गाठून गायके मामाचे कृत्‍य सांगितले. याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software