खुलताबादच्या उरूससाठी प्रशासन सज्‍ज; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : जर जरी बक्ष उर्स महोत्सवात भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे. त्यादृष्टीने सर्व तपासण्या वेळीच पूर्ण कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले. हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी बक्ष यांचा ७३८ वा उर्स महोत्सव ९ ते १७ सप्‍टेंबरदरम्यान खुलताबाद येथे होत आहे. या निमित्त प्रशासनामार्फत […]

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : जर जरी बक्ष उर्स महोत्सवात भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे. त्यादृष्टीने सर्व तपासण्या वेळीच पूर्ण कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी बक्ष यांचा ७३८ वा उर्स महोत्सव ९ ते १७ सप्‍टेंबरदरम्यान खुलताबाद येथे होत आहे. या निमित्त प्रशासनामार्फत कराव्याच्या पूर्व तयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (३ सप्‍टेंबर) खुलताबाद येथे दर्गास्थळी जाऊन आढावा घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक धनंजय वराडे, नगरपालिका मुख्याधिकारी विक्रम दराडे, दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, ॲड. कैसेरोद्दीन, मुबशिरोद्दीन, कामारानोद्दीन आदी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, उर्स महोत्सवात येणारे भाविक, त्यातही महिला भाविक, लहान बालके यांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यात्रेत विकले जाणारे खाद्य पदार्थ हे भेसळयुक्त नसावे यादृष्टीने अन्न, खाद्य पदार्थ नमुन्यांची तपासणी करण्यात यावी. तपासणी शिवाय खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवता येणार नाही. गॅस सारख्या इंधनाची, पेट्रोल, डिझेलसारखे पदार्थ यांची साठवणूक व वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन करावी. यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेराद्वारे निगराणी ठेवावी. गुप्तचर पोलीस, महिला पोलीस यांच्यासह दर्गा कमिटीचे स्वयंसेवक यांनी यात्रेत फिरून असामाजिक, संशयस्पद व्यक्तींवर नियंत्रण ठेवावे. कुणीही गैरकृत्य करताना आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी. हरवलेली बालके, व्यक्ती यांच्या शोधासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष व उदघोषणा यंत्रणा कार्यान्वित करावी. पोलीस अधीक्षक डॉ. राठोड म्हणाले की, पोलीस बंदोबस्त पुरेसा असेल. उर्स उत्सवात होणारी लोकांची गर्दी पाहता सुरक्षा उपायांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software