केमिकलच्या टँकरला अचानक गळती ; ८ तासांत अवघे टँकर रिकामे…, ग्रामस्थांच्या प्रकृतीचा झाला ‘लोच्या’, वैजापूरच्या या गावातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : सल्फ्युरिक ॲसिड घेऊन मुंबईहून जालन्याला जाणाऱ्या टँकरला अचानक गळती लागून हजारो लिटर केमिकल महामार्गावर पसरले. ही घटना वैजापूर तालुक्‍यातील बोरदहेगाव येथील न्यू हायस्कूलजवळ बुधवारी (४ डिसेंबर) पहाटे दीडला घडली. सकाळी नऊपर्यंत गळती सुरूच असल्याने लोकांची गर्दी जमली. वैजापूर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरहून अग्निशमन दलाचा बंब बोलावला. त्यानंतर सकाळी ११ वाजता टँकर हलवले. […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : सल्फ्युरिक ॲसिड घेऊन मुंबईहून जालन्याला जाणाऱ्या टँकरला अचानक गळती लागून हजारो लिटर केमिकल महामार्गावर पसरले. ही घटना वैजापूर तालुक्‍यातील बोरदहेगाव येथील न्यू हायस्कूलजवळ बुधवारी (४ डिसेंबर) पहाटे दीडला घडली.

सकाळी नऊपर्यंत गळती सुरूच असल्याने लोकांची गर्दी जमली. वैजापूर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरहून अग्निशमन दलाचा बंब बोलावला. त्यानंतर सकाळी ११ वाजता टँकर हलवले. केमिकलच्या वासाने ग्रामस्थांना डोकेदुखी, डोळे जळजळ करण्याचे प्रकार घडले. उग्र वास पसरल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. अनेकांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. टँकरची क्षमता ३० टनची होती. ८ तासांत टँकर रिकामा झाला. जुना टँकर असल्याने टाकीला खड्ड्यांचे हादरे बसून छिद्र पडले आणि गळती झाली. सल्फ्युरिक ॲसिड घातक असून, त्‍याचा संपर्क मानवाच्या शरीराशी आला तर शरीर जळते. जमिनीवर पडले तर जमिनी नापीक होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software