कन्‍नडचे माजी नगरसेवक कैलास जाधव यांच्यावर टोळक्‍याचा हल्ला, फायटर, लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाणीत गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्‍नडचे माजी नगरसेवक कैलास जाधव यांच्यावर कन्‍नड शहरातील पिशोर नाक्‍यावर गुरुवारी (९ जानेवारी) सायंकाळी साडेसातला चार जणांनी अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात जाधव गंभीर जखमी असून, त्‍यांच्यावर कन्‍नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कन्‍नड शहर पोलिसांनी हल्लेखोर ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कन्‍नड शहर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी […]

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्‍नडचे माजी नगरसेवक कैलास जाधव यांच्यावर कन्‍नड शहरातील पिशोर नाक्‍यावर गुरुवारी (९ जानेवारी) सायंकाळी साडेसातला चार जणांनी अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात जाधव गंभीर जखमी असून, त्‍यांच्यावर कन्‍नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कन्‍नड शहर पोलिसांनी हल्लेखोर ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कन्‍नड शहर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी तक्रार दिली. तक्रारीत त्‍यांनी म्‍हटले आहे, की अंधानेर येथील शेती काम आटोपून मोटरसायकलीवर बसून घरी येत असताना पिशोर नाका येथील तिरुपती हॉस्पिटलसमोर त्यांना जाबीर रशीद शेख व त्याच्या साथीदारांनी अडवले. हा तुझ्या बापाचा रस्ता आहे का, असे म्हणत त्‍यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर लाथा- बुक्‍क्यांनी मारहाण सुरू केली. जाबीर शेखने त्याच्या हातातील फायटरने डोक्यात मारले. त्यानंतर जाधव बेशुद्ध पडले. नागरिकांनी त्यांना कन्‍नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software