एससी, एसटी, ओबीसी बांधवांनो एकत्र या; ॲड. आंबेडकरांची वैजापूरमध्ये हाक; अहिल्या संदेश यात्रेला चांगला प्रतिसाद

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी मैदानात उतरलेल्या ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदेश यात्रेला वैजापूर तालुक्‍यात उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. एससी, एसटी, ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आरक्षणवादी उमेदवारांनाच विधानसभा निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन त्‍यांनी यात्रेच्या तालुक्‍यातील समारोपावेळी केले. ॲड. आंबेडकर म्‍हणाले, की अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांना आरक्षण हे त्यांच्या परिस्थितीनुरूप मिळाले आहे. […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी मैदानात उतरलेल्या ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदेश यात्रेला वैजापूर तालुक्‍यात उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. एससी, एसटी, ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आरक्षणवादी उमेदवारांनाच विधानसभा निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन त्‍यांनी यात्रेच्या तालुक्‍यातील समारोपावेळी केले.

ॲड. आंबेडकर म्‍हणाले, की अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांना आरक्षण हे त्यांच्या परिस्थितीनुरूप मिळाले आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष आरक्षणाचे मारेकरी असून त्यांना काहीही करून आरक्षण संपवायचे आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्‍हणाले. ॲड. आंबेडकर यांची अहिल्या संदेश यात्रा १० दिवस वैजापूर तालुक्यातील ७० गावांत फिरली. यात्रेला तालुक्‍यात चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रेचा तालुक्यातील समारोप बुधवारी (११ सप्‍टेंबर) झाला. प्रास्ताविक बाळासाहेब जानराव, सुनील गायकवाड यांनी केले. (ॲड. आंबेडकर यांच्या भाषणाचा पूर्ण व्हिडीओ पहा पुढील लिंकवर क्लिक करून : https://fb.watch/uymMUZarRO/ )

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software