आजारी असताना नाटक करते म्‍हणून २६ वर्षीय विवाहितेला ठेवायचे उपाशी!; देवगाव रंगारी पोलिसांत तिने सांगितली आपबिती

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २६ वर्षीय विवाहितेचा हुंड्याच्या २ लाख रुपयांसाठी छळ मांडल्याप्रकरणी देवगाव रंगारी (ता. कन्‍नड) पोलिसांनी तिच्या पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध गुरुवारी (२१ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात वैशाली नवनाथ बोरसे (वय २६, रा. शेरोडी ता. कन्नड, ह. मु. रा. जवळी, ता. कन्नड) या विवाहितेने तक्रार दिली आहे. तक्रारीत म्‍हटले आहे, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २६ वर्षीय विवाहितेचा हुंड्याच्या २ लाख रुपयांसाठी छळ मांडल्याप्रकरणी देवगाव रंगारी (ता. कन्‍नड) पोलिसांनी तिच्या पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध गुरुवारी (२१ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात वैशाली नवनाथ बोरसे (वय २६, रा. शेरोडी ता. कन्नड, ह. मु. रा. जवळी, ता. कन्नड) या विवाहितेने तक्रार दिली आहे. तक्रारीत म्‍हटले आहे, की नवनाथ हरिभाऊ बोरसे (रा. शेरोडी) याच्यासोबत तिचे लग्न १२ जानेवारी २०१६ रोजी झाले होते. तिच्या घरी सासरे हरिभाऊ केशवराव बोरसे, सासू पद्‌माबाई हरिभाऊ बोरसे असतात. लग्नानंतर सुरुवातीचे दीड वर्ष तिला पती, सासू, सासऱ्यांनी चांगले नांदविले. त्यानंतर पती रोज घरी दारू पिऊन येत मारहाण करायचा. तुझ्या वडिलांनी मला दोन लाख रुपये हुंडा दिला नाही, असे म्हणून शिवीगाळ करायचा.

सासू, सासरेदेखील तू माहेरावरून काहीच आणले नाही. तू इथे राहू नको. तुझ्या माहेरावरून हुंड्याचे पैसे घेऊन ये, तरच इथे रहा. नाहीतर आमच्या घरातून निघून जा, असे म्हणून तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचे. तिला एक मुलगा, एक मुलगी झाली. तीन महिन्यांपूर्वी ती आजारी असताना पतीने तिला लाथाबुक्‍क्याने मारहाण करून तू आजारी असल्याचे नाटक करीत आहे, असे म्हणून उपाशीपोटी ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर विवाहितेने त्याच्याविरोधात कन्नड पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार केली. मात्र पतीमध्ये काहीच सुधारणा झाली नाही. अखेर सर्वांच्या जाचाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी ती माहेरी जवळी येथे आई-वडिलांकडे राहण्यास आली.

२० नोव्‍हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पती नवनाथ हरिभाऊ बोरसे दारू पिऊन वडिलांच्या घरी जवळी येथे आला. सासरी येत नाही म्‍हणून शिवीगाळ करू लागला. त्यावेळी तिचे आई-वडील समजावून सांगू लागले असता दोघांनाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तिची आजारी असलेली आजी ही खाटेवर झोपलेली असताना खाली ओढून लोटलाट केली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार केशरसिंग राजपूत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software