आई मिरच्या तोडत असताना चिमुकला खेळत हौदाकडे गेला अन्‌ बुडून मृत्‍यू!, सिल्लोडच्या रहिमाबादची दुर्दैवी घटना

On

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : साडेचार वर्षीय बालकाचा शेतातील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (४ जुलै) दुपारी रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथे घडली. कार्तिक भगवान मोरे (रा. रहिमाबाद) असे मृत्‍यू झालेल्या बालकाचे नाव आहे. कार्तिकची आई कोमल मोरे या समाधान नवल यांच्या शेतात मिरची तोडण्यासाठी गेल्या होत्या. कार्तिकही आईसोबत शेतात गेला होता. आई मिरच्या […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : साडेचार वर्षीय बालकाचा शेतातील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (४ जुलै) दुपारी रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथे घडली. कार्तिक भगवान मोरे (रा. रहिमाबाद) असे मृत्‍यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

कार्तिकची आई कोमल मोरे या समाधान नवल यांच्या शेतात मिरची तोडण्यासाठी गेल्या होत्या. कार्तिकही आईसोबत शेतात गेला होता. आई मिरच्या तोडत असताना तो हौदाजवळ खेळत होता. खेळता-खेळता पाण्यात पडला. ही बाब लक्षात येताच त्‍याला सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन काळे आणि सतीश पाटील करत आहेत. कार्तिकचे वडील भगवान मोरे सूरतला मजुरीसाठी गेले असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना

Latest News

नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : झोक्यावरून पडून आपेगाव (ता. पैठण) येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुलै)...
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software