कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे ही सर्व संबंधित विभागांची सामूहिक जबाबदारी आहे. परीक्षा म्हणजे प्राप्त ज्ञानाची उजळणी असते. त्यासाठी कॉपीसारख्या गैरमार्गाचा वापर ही अनुचित व अनैतिक बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, १७ जानेवारीला केले.

संत एकनाथ रंगमंदिरात माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या अनुषंगाने कॉपीमुक्त अभियान राबविण्यासंदर्भात मुख्याध्यापक, शिक्षकांची सभा पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिव श्रीमती प्रियाराणी पाटील, सहसचिव दीपक कोकतरे, जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक)आश्विनी लाठकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा मेहेत्रे, दीपाली थावरे, गीता तांदळे तसेच गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की सुसंस्कारीत विद्यार्थी घडविणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी दशसुत्रीसारखे उपक्रम शिक्षकांनी राबवावे. जेणेकरून कॉपीसारख्या अपप्रवृत्तींना विद्यार्थी बळी पडणार नाहीत. कायद्याचा, सुरक्षा यंत्रणेचा वापर करून कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करता येईल, असे आवाहन त्यांनी केले. श्रीमती लाठकर यांनी आभार मानले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?

Latest News

पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..? पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  लैंगिक अत्याचाराची तक्रार घेऊन पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आलेल्या पीडित तरुणीच्या पतीच्या कानशिलात सहायक फौजदाराने...
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...
अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software