मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पैठणखेडा येथे ४० वर्षीय युवकाचा मृतदेह त्याच्या शेजारी राहणाऱ्या मित्राच्या घरात संशयास्पदरीत्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (१२ मार्च) सायंकाळी सहाच्या सुमारास समोर आली.

नवनाथ नामदेव भादे (वय ४०, रा. पैठणखेडा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. नवनाथचा मृतदेह त्यांचे मित्र असलेले शेजारी विष्णू घुंगार्डे यांच्या घरात आढळला. ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाइकांच्या मदतीने मृतदेह बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालय आणला. उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घातपात असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजीवन कदम तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software