संथगतीने सुरू असलेल्या कामाने घेतला सुरक्षारक्षकाचा बळी!; खडीवरून दुचाकी घसरून झाडाला धडकली, पैठण रोड-लिंकरोडदरम्यान अपघात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संथगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे खडीवरून दुचाकी घसरली. यात ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (११ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास पैठण रोड ते लिंक रोडदरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थान परिसरात घडली.

संदीप रमेशराव पतंगे (मूळ रा. येळंब, ता. हदगाव, जि. नांदेड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. संदीप काही महिन्यांपासून नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगरात संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील शिवनगरमध्ये राहत होते. ते खासगी कंपनीत सुरक्षारक्षक होते.  बुधवारी दुपारी १ ला दुचाकीने कामावर जात होते. काम सुरू असलेल्या रस्त्यावर खडीवरून दुचाकी घसरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. संदीप यांच्या डोके व छातीला गंभीर दुखापत झाली.

नागरिकांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सातारा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एन. के. भगत यांनी सांगितले. या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. प्रमोद अंकुश कुटे हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच २१ जे १५१७) जात असताना भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत कुटे गंभीर जखमी झाले. कुटे यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना

Latest News

सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
पाचोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या युवतीला सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर प्रेमात पाडले, नंतर ४ महिने दोघे एकत्र...
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software