नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड/कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा)  : सिल्लोड तालुक्यातील म्हसला (बुद्रूक) येथे संदीप दशरथ गोराडे (वय ३६, रा. म्हसला बुद्रूक) आणि कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भागीनाथ काशीनाथ सोनवणे (वय ६५, रा. देवगाव रंगारी) या २ शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. बुधवारी (११ मार्च) या घटना समोर आल्या.

संदीप गोराडे यांनी मंगळवारी रात्री शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. सततची नापिकी व बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

देवगाव रंगारीत वृद्धाची आत्महत्या
देवगाव रंगारी येथील अल्पभूधारक शेतकरी भागीनाथ सोनवणे यांनी सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ते घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतला असता वेळगंगा नदीकाठच्या विहिरीच्या कठड्यावर त्यांचा मोबाइल आणि शर्ट आढळला. बुधवारी सकाळी अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांच्यावर ५० हजार रुपयांचे कर्ज होते. देवगाव रंगारी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software