पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  लैंगिक अत्याचाराची तक्रार घेऊन पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आलेल्या पीडित तरुणीच्या पतीच्या कानशिलात सहायक फौजदाराने लगावली. जोरात फटका बसताच तो जमिनीवर कोसळला. नंतर पोलिसांनीच त्याला घाटी रुग्णालयात नेले. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. घटनेचे सत्य काय आहे, हे मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राने जाणून घेतले असता, पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले, की तरुणीच्या पतीने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी अवाजवी हुज्जत घातली. याच दरम्यान त्याला अचानक फीट आल्याने पोलिसांनीच त्याला सरकारी वाहनातून घाटीत नेल्याचे सांगितले. दरम्यान, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यास सत्य समोर येईल, असे महिलेच्या पतीने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण...
पीडित २२ वर्षीय तरुणीचा तिच्या पतीसोबत वाद सुरू आहे. पोटगीचा दावा दाखल करण्यासाठी तिची ओळख ॲड. किशोर गायकवाड (वय २९, रा. चौका, फुलंब्री) याच्याशी झाली. मात्र पुढे पती-पत्नीमधील वाद मिटला. त्यानंतर तरुणीने केस बंद करण्यास वकिलाला सांगितले. मात्र, वकिलाने फीचे उर्वरित २० हजार रुपये मागितले. पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने १६ जानेवारी २०२६ रोजी तिच्या घरात शिरून पैशांच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली. त्याने बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर १३ व १६ फेब्रुवारी रोजी पुन्हा अत्याचार केल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. हा प्रकार वाढतच चालल्याने तरुणीने पतीसह पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

शाब्दिक चकमक अन्‌ मारहाण...
तरुणी व तिचा पती पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता पोलीस अंमलदाराकडे तरुणीने आपबिती मांडली. या वेळी पोलीस आणि तरुणीच्या पतीत शाब्दिक चकमक झाली. आरोपानुसार, सहायक फौजदाराने तरुणीच्या पतीच्या कानशिलात मारली. फटका इतका जोरात होता, की तरुणीचा पती जमिनीवर कोसळला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software