३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कन्नड शहराजवळील शिवना नदीकाठी शिवनगर परिसरात बुधवारी (११ मार्च) सकाळी १०:३० च्या सुमारास आढळला. रवींद्र गंगाधर मोरे (वय ४५, रा. शिवनगर कोळीवाडा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

रवींद्र बेपत्ता झाल्यानंतर मित्रपरिवार व शेजाऱ्यांनी शोधाशोध केली. मात्र शोध लागला नव्हता. शिवना नदीकाठी झुडुपांत मृतदेह आढळला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. सदाशिव पाटील यांनी पोलिसांना कळवताच सहायक फौजदार नासेर पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. रवींद्र यांच्या पश्चात आई आहे. घटनेची नोंद कन्नड शहर पोलिसांनी घेतली आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software