जागर स्त्रीशक्तीचा : सशक्त समाज निर्मितीत महिलांची भूमिका मोलाची, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : समाजाची प्रगती होत असताना हा समाज वैचारीक, सांपत्तिक आणि आरोग्यदृष्ट्या सशक्त असणे आवश्यक असते. कुटुंब सांभाळणारी महिला संस्कार करून आपले कुटूंब आणि पर्यायाने समाज सशक्त बनवत असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २४ सप्टेंबरला केले.

552434959_1127493496148345_11440 (1)

दशसूत्री कार्यक्रमांतर्गत ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या उपक्रमांतर्गत महिला शिक्षकांसाठी विशेष संवाद कार्यशाळा छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. विचाराने धनवान होतो आणि आरोग्य व संस्कार हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत.

550542499_1127493606148334_44512 (1)

शिक्षणासोबत वैचारिक प्रगल्भता महत्वाची. नवदुर्गा व त्यांचे माहात्म्य हे आजच्या स्त्री मध्येही आहे. त्यामुळेच आपण सशक्त समाजनिर्मितीत करू शकता, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात महिला शिक्षकांच्या आरोग्य तपासणीने झाली. कार्यशाळेसाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला शिक्षकांची उपस्थिती होती. या वेळी राज्य पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी मनीषा वाशिंबे यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी धनराज कांबळे यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software