अपार्टमेंट टेरेसवर बांधलेल्या अनधिकृत खोल्या पाडल्या!; जिन्सी भागात महापालिकेची कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : स्टार हाइट्स अपार्टमेंटच्या टेरेसवर बांधलेल्या अनधिकृत दोन खोल्या आणि बाथरूम महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (१६ ऑक्‍टोबर) पाडले. जिन्सी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

अपार्टमेंटमध्ये एका फ्‍लॅटधारकाने टेरेसवर चक्क दहा बाय दहा फूट आकाराच्या दोन खोल्या आणि बाथरूम बांधले होते. या बांधकामाबद्दल ज्येष्ठ नागरिक नाहीद सुलताना यांनी महापालिकेकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, बांधकाम करणारा व्यक्ती टेरेसचा इतरांना वापर करू देत नाही. टेरेस वापरण्याचा प्रयत्न केला तर शिवीगाळ केली. तक्रारीनंतर महापालिकेने कारवाईसाठी पथक पाठवले होते. त्यावेळी त्या व्यक्तीने मुलीचे लग्न असल्याने १० दिवसांची मुदत मागितली होती.

महापालिकेचे पथक माघारी फिरताच त्या व्यक्तीने याच विषयावरून न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर महापालिकेने दोन वेळा नोटिसा बजावल्या. तरीही त्या व्यक्तीने दाद दिली नाही. अखेर महापालिकेच्या प्रशासनाने या नौटंकीबाज व्यक्तीला जास्त महत्त्व न देता थेट अपार्टमेंटवर पथक नेले आणि दोन्ही खोल्या व बाथरूमला पाडून टाकले. अशा पद्धतीने शहरात अन्य अपार्टमेंटमध्येही अनधिकृत बांधकामे केली आहेत का, याचा तपास महापालिकेने करावा आणि तीही अतिक्रमणे उद्‌ध्वस्त करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.  

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...

Latest News

इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ... इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगोची मुंबईसाठीची सायंकाळची विमानसेवा २९ मार्चपासून नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणार आहे. ऑनलाइन आरक्षण...
मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software