त्रिभाषा धोरण निश्चिती समिती २६ नोव्‍हेंबरला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, डॉ. विशाल तायडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. केशरचंद राठोड, पवनकुमार गोरे, देवगिरी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. समिता जाधव, डॉ. एम.एफ. मेवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे आदी उपस्थित होते. बैठकीत माहिती देण्यात आली की. त्रिभाषा धोरण निश्चिती समिती २५ नोव्‍हेंबरला रात्री जिल्ह्यात येणार असून, २६ नोव्‍हेंबरला सकाळी ११ पासून एमआयटी महाविद्यालयाच्या आनंद सभागृहात समिती विविध घटकांना भेटणार आहे. त्यात भाषा तज्‍ज्ञ, साहित्यिक, शिक्षण तज्‍ज्ञ, बालमानस तज्‍ज्ञ, शिक्षण तज्‍ज्ञ, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यम प्रतिनिधी, शिक्षक- पालक संघ आदी उपस्थित राहतील. त्यांचे म्हणणे समिती जाणून घेईल.

समितीत अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव, सदस्य डॉ. सदानंद मोरे, डॉ. वामन केंद्रे, डॉ. अप्रणा मॉरिस, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. मधुश्री सावजी, डॉ. भूषण शुक्ल, सदस्य सचिव संजय यादव राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान यांचा समावेश आहे. समिती येणाऱ्या सर्व घटकांतील तज्‍ज्ञांचे म्हणणे ऐकून घेईल. तसेच संवाद साधेल, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विभागातील पाचही जिल्ह्यांतील लोक सहभागी होऊन म्हणणे सादर करतील. बाहेरील जिल्ह्यातील लोकांना म्हणणे सादर करण्यासाठी ज्यांना येथे येणे शक्य नाही त्यांच्यासाठी त्या त्या जिल्ह्यातून दूरदृष्य प्रणालीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software