महत्त्वाची बातमी : आता ठरलं... १५०० मि. मी. व्यासाच्या एक्स्प्रेस लाईनमधून नक्षत्रवाडीहून शिवाजीनगरला गुरुत्वाकर्षणाने पोहोचणार पाणी; हायड्रो टेस्टिंग झाली यशस्वी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना लवकरच १५०० मि. मी. व्यासाच्या नव्या एक्स्प्रेस पाइपलाईनमधून पाणी मिळणार असल्याचे शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) निश्चित झाले. नव्या पाणीपुरवठा योजनेत नक्षत्रवाडी येथून शिवाजीनगरपर्यंत गुरुत्वाकर्षणाने पाणी येणार असून, यासाठी टाकलेल्या नव्या एक्स्प्रेस पाइपलाईनची हायड्रो टेस्टिंग देवळाईमध्ये यशस्वीपणे पार पडली.

नव्या पाणीपुरवठा योजनेची कंत्राटदार असलेल्या जीव्हीपीआर कंपनीच्या वतीने देवळाई गाव ते देवळाई चौक अशा दीड किलोमीटर टप्प्यातील पाइपलाईनची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी पार पडल्याने ही पाइपलाईन पूर्ण क्षमतेने पाणी वाहून आणण्यासाठी सक्षम असल्याचे निश्चित झाले.  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या हायड्रो चाचणीसाठी ५० लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. पूर्ण दाबाने पाणी येऊ शकते का, हे पाहण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. मोठा दाब असल्याने चाचणीदरम्यान तब्बल तीन मजले उंच असे पाण्याचे फवारे उडताना लोकांनी पाहिले. नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नक्षत्रवाडी येथील जलकुंभातून गुरुत्वाकर्षणाने शहरात पाणी आणले जाईल. यातील एक एक्स्प्रेस वाहिनी देवळाईमार्गे शिवाजीनगरपर्यंत टाकण्यात आली आहे. या वाहिनीतून शहरात दाखल होणारे पाणी शिवाजीनगर, सिडको, हडको या भागाला पुरविले जाईल.

अशी केली जाते हायड्रो चाचणी
हायड्रो टेस्ट नावाच्या चाचणीमध्ये शहरात पाणी वाहून आणणाऱ्या पाइपमध्ये दीडपट पाणी सोडून त्याच्या दोन्ही बाजू बंद केल्या जातात. या माध्यमातून पाइपची दाब सहन करण्याची शक्ती तसेच गळती आदी बाबी तपासल्या जातात. चाचणीमध्ये पाइपलाईनने उच्च दाब सहन करून गळती न झाल्यास ती पाइपलाईन दाब सहन करण्यासाठी सशक्त असल्याचे निश्चित होते. दरम्यान, हायड्रो टेस्टिंग यशस्वी झाल्याने कंपनीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

दुसरीकडे, जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३८.४५ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे  आता केवळ २१३ मीटर जलवाहिनी टाकणे बाकी असून, या कामासाठी दिवाळी संपल्यानंतर सहा दिवसांचा शटडाऊन घेतला जाणार आहे, असे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियोजन करीत आहे. या शटडाऊन दरम्यान छत्रपती संभाजी नगर शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software