चांगली बातमी : बँक खात्यासह लॉकर अन्‌ सुरक्षित कस्टडीसाठी आता ठेवू शकता चार नॉमिनी; एक नोव्हेंबरपासून होणार सोय!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : बँक खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील पैसे किंवा लॉकरमधील वस्तू आपल्यालाच मिळाव्यात, यावरून त्याच्या नातेवाईकांमध्ये होणाऱ्या वादांवर अखेर सरकारने तोडगा काढला आहे. एक नोव्हेंबरपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल होत असून, यानुसार बँक खातेदार त्यांच्या खात्यासह लॉकर आणि सुरक्षित कस्टडीसाठी एक नव्हे तर चार जणांना नामांकित करू शकणार आहेत.

एक नोव्हेंबरपासून बँकिंग कायद्यात बदल होत असून यासंदर्भात सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. याआधी बहुतांश बँकांमध्ये खातेदारांना फक्त एका व्यक्तीला नॉमिनी करण्याची परवानगी होती. परंतु, आता बदललेल्या नियमानुसार खातेदार चार जणांना नॉमिनी करू शकणार आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या खात्यातील किंवा लॉकरमधील किती टक्के रक्कम कोणत्या नॉमिनीला मिळावी याचा निर्णयही बँक खातेदार घेऊ शकणार आहे. अर्थात, एखाद्या खातेदाराने नामांकित केलेला पहिल्या क्रमांकाचा व्यक्ती पात्र नसेल तर दुसरा नामांकित व्यक्ती त्याची जागा घेऊ शकेल.

हीच पद्धत लॉकर आणि सुरक्षित कस्टडीसाठी देखील लागू असेल. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, बँकांच्या नियमांमध्ये एक तारखेपासून बदल लागू होत आहे. हा कायदा एप्रिल २०२५ मध्ये अधिसूचित करण्यात आला असून एकंदरीत १९ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया कायदा १९३४, बँकिंग नियमन कायदा १९४९, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा १९५५, बँकिंग कंपन्या कायदा १९७० आणि १९८० अशा एकूण  पाच कायद्यांमध्ये या दुरुस्त्या करण्यात आले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software