प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न!; फराळ किट, किराणा साहित्य अन्‌ रब्बी हंगामासाठी बियाणे किटचे केले वाटप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आज, १६ ऑक्‍टोबरला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ‘एक हात मदतीचा’ दिला. दिवाळ सणासाठी लागणाऱ्या वाण सामानाचे किट देण्यात आले. शेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी प्रसंगाला आपण सामोरे जात असताना खचून जाऊ नका, प्रशासन, समाज तुमच्या सोबत आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित शेतकरी कुटुंबीयांना दिला.

567194685_1146673040897057_25543 (1)

जिल्हाधिकारी कार्यातील नियोजन सभागृहात पैठण, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर या तीन तालुक्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली. फराळ किट आणि किराणा साहित्य, रब्बी हंगामासाठी बियाणे किट वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनासोबत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग संस्थान, वेरूळ यांच्या सहकार्याने हे साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मनसुख झांबड, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, पैठण- फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, पैठण तहसीलदार ज्योती पवार, फुलंब्री तहसीलदार योगिता खटावकर, पैठण, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी कुटुंबीय या कार्यक्रमास उपस्थित होते.

561755063_1146672824230412_54444 (1)

२६७ कुटुंबांना मदतीचा हात
जिल्ह्यातील एकूण २६७ जणांना ही मदत देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड येथे सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात आली. उद्या, १७ ऑक्टोबरला सकाळी १० वा. कन्नड येथे कन्नड व खुलताबाद तालुक्यातील व दुपारी ३ वा. लासूर स्टेशन येथे वैजापूर, गंगापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत देण्यात येईल.

असा राबविला उपक्रम
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवाड्यानिमित्त तालुकास्तरावर केले. या सर्वेक्षणातून मदतीची गरज असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची निवड करण्यात आली. शासकीय योजनेच्या लाभाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून एक किट तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण २६७ कुटुंबियांना मदत केली जात आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३९ शेतकरी कुटुंब, फुलंब्रीमध्ये ३०, पैठण तालुक्याचे ४०, सिल्लोड येथील ६२, सोयगाव येथील १२, कन्नड येथील ३६, खुलताबाद येथील ४ शेतकरी आणि वैजापूर येथील १० गंगापूर येथील ३४ तसेच इतर उर्वरित सदस्यांना मदत करण्यात येणार आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software