पैठण गेटजवळील अतिक्रमणांची पाडापाडी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मंगळवारवर गेली!, १२५ मालमत्तांवर मार्किंग

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठण गेट परिसरातील अतिक्रमित दुकाने हटवण्यासाठी महापालिकेने हालचाली गतिमान केल्या आहेत. गुरुवारी (१३ नोव्‍हेंबर) नगररचना विभागाने टोटल स्टेशन सर्वेक्षण केले. शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) पैठण गेट ते सिल्लेखाना चौक (३० मीटर), पैठण गेट ते सब्जीमंडी (९ मीटर) आणि पैठण गेट ते खोकडपुरा (१२ मीटर) या तीन महत्त्वाच्या रस्त्यांवरील सुमारे १२५ मालमत्तांवर मार्किंग केली आहे. आज, १५ नोव्हेंबरला पाडापाडी केली जाणार होती, मात्र उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहरात दौरा असल्याने ही कारवाई मंगळवारवर (१८ नोव्‍हेंबर) गेल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. तोपर्यंत अतिक्रमणे काढून घेण्याची संधी देण्यात आली आहे.

पैठणगेट येथील एस. एस. मोबाईल शॉपीसमोर सोमवारी (१० नोव्‍हेंबर) रात्री सव्वा दहाच्या सुमारास शेख परवेज शेख मेहमूद (वय ३६, सब्जीमंडी) याने इमरान अकबर कुरेशी (वय ३३, रा. सिल्लेखाना) याची चाकूने गळा चिरून हत्या केली. परवेजचे दुकान अतिक्रमणात आहे. त्यामुळे कुरैशी समाजाने अतिक्रमित दुकानांचा मुद्दा उचलून धरला आहे. निमित्तच हाती लागल्याने महापालिकेलाही अधिक आक्रमकपणे ही अतिक्रमणे पाडण्याच्या कामाला लागली आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंतचा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिला आहे. कपडे आणि मोबाइल विक्रीची अनेक दुकाने पाडापाडीत जाणार आहेत. काही दुकाने तर चक्क मनपाच्या जागेवर असल्याने मार्किंगमध्ये समोर आले. एक मोठी इमारतही बाधित होत आहे. त्या मालकाला मोबदला देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. मनपाने मार्किंग पूर्ण केली असून नोटिसादेखील बजावण्यात आल्याची माहिती अधिकारिक सूत्रांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software