नागरिकांची दिवाळी आरोग्यदायी करा;जिल्हाधिकाऱ्यांची आरोग्य यंत्रणेला सूचना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : नुकतीच झालेली अतिवृष्टी, त्यामुळे दुषित झालेले जलसाठे, दिवाळीसारख्या सणामुळे खाद्यपदार्थांतून होणाऱ्या भेसळीचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी अधिक सतर्क राहून दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (१५ ऑक्‍टोबर) आरोग्य यंत्रणांना दिले.
जिल्हा आरोग्य यंत्रणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, महिला व बालविकास अधिकारी मंगला पांचाळ तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वातावरणीय बदल व आरोग्य, नियमित लसीकरण, गोवर रुबेला लसीकरण, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अभियान, एचआयव्ही एड्स नियंत्रण अभियान, गर्भलिंग निदान विरोधी अभियान, आपात्कालिन वैद्यकीय सेवा याबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या गेल्या वर्षाइतकीच असली तरी अपघातानंतर मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आरोग्य सेवांची समिक्षा करण्यात यावी. जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन आरोग्य विषयक मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. अतिवृष्टीमुळे ग्रामिण भागात पाणीसाठे व स्रोत दूषित झाले आहेत. तसेच शहरी भागात सणाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थात भेसळ होण्याची शक्यता आहे. त्याविरुद्ध संबंधित विभागांनी बाजारात मिळणारे अन्न पदार्थ नमुने चाचणी करावी. ऐन सणासुदीत नागरिकांचे आरोग्य उत्तम राहील यासाठी अरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software