जात-धर्म पाहून न्याय दिला जातो : भीमराव आंबेडकर यांचा आरोप, पुरावे कसले मागता, महाबोधी महाविहार तत्काळ बौद्धांच्या हवाली करण्याची केली मागणी!, छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य धम्मसोहळा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : देशभरातील हिंदूंच्या श्रद्धेचा मान राखून अयोध्येतील राम जन्मभूमी त्यांच्या हवाली करण्यात आली. अगदी असाच बुद्धगयेतील महाबोधी महाविहार हा भारतच नव्हे तर जगभरातील बौद्धांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. राम जन्मभूमीला लावले तसेच निकष लावून महाविहाराची जागा बौद्धांच्या हवाली करायला हवी, असा प्रहार अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी (१९ ऑक्‍टोबर) छत्रपती संभाजीनगरात केला.

आदर्श बौद्ध समाजाच्या निर्मितीसाठी धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारे भदंत करुणानंद थेरो यांचा महाथेरो विधान समारंभ आणि कठीण चिवरदान धम्मसोहळा मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर हजारो बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याचे उद्‌घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी ते म्हणाले, ऐतिहासिक महाबोधी महाविहाराची जागा फक्त बौद्धांचीच आहे. महाबोधी महाविहाराचा इतिहास ब्रिटिश इतिहासकारांनी लिहून ठेवला आहे. चिनी प्रवाशांनीही या ऐतिहासिक भूमीची नोंद केलेली आहे. सध्या हे ऐतिहासिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे.

मात्र असे असताना ही जागा बौद्धांच्या हाती सोपविण्यासाठी त्याचे पुरावे मागण्यात येत आहेत. खरंतर रामजन्मभूमीत उत्खनन सुरू झाल्यावर त्या ठिकाणी बौद्ध धम्माशी संबंधित अवशेष सापडले होते. त्यामुळे ही जागा बौद्धांच्या हवाली करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने आमच्या वकिलालाच दंड ठेवला. यावरून पक्षकाराची जात आणि धर्म पाहून न्याय दिला जातो हे स्पष्ट झाले, असा आरोपही आंबेडकर यांनी केला. भारतीय संविधानाच्या कलम २५ नुसार धर्मांतर हा मूलभूत हक्क असूनही धर्मांतर विरोधी कायदे करून या हक्कावर गदा आणली जात आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी या वेळी केला. लवकरच होऊ घातलेल्या जातनिहाय जनगणनेच्या वेळी धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यात स्वतःची जात लिहा.

यातून देशभरातील बौद्धांची नेमकी संख्या पुढे येईल, असे आवाहनही त्यांनी उपस्थित त्यांना केले. या वेळी भदंत शरणानंद महाथेरो, भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदंत बोधीपालो महाथेरो, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत विशुधानंदबोधी महाथेरो, भदंत विनय रक्खित महाथेरो, भदंत सुमनवन्नो महाथेरो, भदंत प्रा. डॉ. एम. सत्यपाल, भदंत एस. प्रज्ञाबोधी महाथेरो, भिक्खू धम्मबोधी महाथेरो यांच्यासह सोहळ्याचे निमंत्रक प्रा. प्रदीप रोहे, शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे, मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, स्मार्टसिटीचे उपायुक्त रवींद्र जोगदंड, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, सामाजिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. ए. भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यासाठी देशभरातून हजारो उपासक, उपासिका छत्रपती संभाजीनगरात आले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software