हातगाडीवाले, पथविक्रेत्‍यांचा महापालिकेसमोर भरपावसात आक्रोश!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्‍त्‍यावरच हातगाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केल्याने रस्ते मोकळे होत असले तरी, दुसरीकडे मात्र त्‍या हातगाड्यावाल्यांच्या उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, या मागणीसाठी सोमवारी (२१ ऑक्‍टोबर) दुपारी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनतर्फे महापालिकेसमोर भर पावसात निदर्शने करण्यात आली. पथविक्रेते आणि […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्‍त्‍यावरच हातगाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केल्याने रस्ते मोकळे होत असले तरी, दुसरीकडे मात्र त्‍या हातगाड्यावाल्यांच्या उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, या मागणीसाठी सोमवारी (२१ ऑक्‍टोबर) दुपारी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनतर्फे महापालिकेसमोर भर पावसात निदर्शने करण्यात आली.

पथविक्रेते आणि हातगाड्यांवर महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग कारवाई करत आहे. पैठण गेट ते गुलमंडीसह बाजारपेठेत प्रामुख्यानो ही कारवाई करून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मात्र यामुळे गोरगरीबांच्या पोटावर पाय पडला आहे. त्‍यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने कारवाई थांबवावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

महापालिका प्रशासकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने हातगाडीचालकांचे साहित्य उचलून नेणे सुरू केले आहे. हातगाड्या जप्त करणे, ती परत न देणे ही कामे बेकायदा आहेत. कायद्यात कुठेही तरतूद नाही. दिवाळी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये. दरवर्षीप्रमाणे पैठणगेट येथे बॅरिकेट्स लावावेत, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात मोठ्या संख्येने पथविक्रेते, हातगाडीवाले सहभागी झाले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software