हर घर तिरंगा अभियानात शाळा, महाविद्यालयांनी सहभाग द्यावा; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ‘हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांत देशभक्तीचे संस्कार रुजविण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयांनी या कार्यक्रमात सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. जिल्हा नियोजन सभागृहात शुक्रवारी (९ ऑगस्ट) महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे, प्रशासकीय अधिकारी उच्च […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ‘हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांत देशभक्तीचे संस्कार रुजविण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयांनी या कार्यक्रमात सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन सभागृहात शुक्रवारी (९ ऑगस्ट) महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे, प्रशासकीय अधिकारी उच्च शिक्षण वनिता सांजेकर तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, घरोघरी तिरंगा हे अभियान सर्व तालुके आणि गावांमध्ये विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबवायचे आहे. त्यात प्रामुख्याने आपल्या घरावर, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय इमारतींवर तिरंगा ध्वज लावता येणार आहे. या अभियानात सर्वांना सक्रिय सहभागी होता येणार आहे. हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी महाविद्यालयांनी प्रयत्न करावे. अभियानात तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात महाविद्यालये व महाविद्यालयांतील युवक, युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software