- News
- सिटी डायरी
- विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग सुदृढ न्यायव्यवस्थेचे द्योतक : उपमुख्यमंत्री फडणवीस; महाराष्ट्र
विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग सुदृढ न्यायव्यवस्थेचे द्योतक : उपमुख्यमंत्री फडणवीस; महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापिठात मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : विधी व न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय ही सकारात्मक बाब असून भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचे ते द्योतक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापिठाच्या मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : विधी व न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय ही सकारात्मक बाब असून भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचे ते द्योतक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.


श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाने जगण्याच्या प्रत्येक पैलूला व्यापले आहे. कायदा व विधी क्षेत्रही त्याला अपवाद नाही. न्यायदानाची प्रक्रिया ही अधिकाधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख करण्यात आपण योग्यदिशेने पावले टाकत आहोत. विधी व न्यायाच्या क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही सुद्धा एक सकारात्मक बाब आहे. महिलांच्या सहभागाने न्याय व्यवस्था अधिक बळकट आणि सुदृढ आहे, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. मुलींसाठी वसतीगृह उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व त्यांनी शिस्तीचे पालन करुन विधी क्षेत्रातील ज्ञानार्जन करावे,असे आवाहनही केले.

प्रास्ताविक प्रभारी कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीनाथ यांनी केले. न्या. रविंद्र घुगे, महाअधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यापीठाच्या जडणघडण व प्रगतीविषयक विचार मांडले. कुलसचिव धनाजी जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

