कोरोना छत्रपती संभाजीनगरकरांच्या मानगुटीवर बसतोय… आणखी ५ रुग्ण आढळले, रुग्णसंख्या १७ वर

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वेळीच खबरदारी अन्‌ प्रभावी उपाययोजना न राबविल्यास कोरोना छत्रपती संभाजीनगरकरांच्या मानगुटीवर बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शनिवारी (३ ऑगस्ट) काेरोनाचे आणखी ५ पॉझिटिव्‍ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. आता रुग्णसंख्या १७ वर गेली आहे. डेंग्‍यूचाही एक रुग्ण आढळला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले. सध्या शहरातील घराघरात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वेळीच खबरदारी अन्‌ प्रभावी उपाययोजना न राबविल्यास कोरोना छत्रपती संभाजीनगरकरांच्या मानगुटीवर बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शनिवारी (३ ऑगस्ट) काेरोनाचे आणखी ५ पॉझिटिव्‍ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. आता रुग्णसंख्या १७ वर गेली आहे. डेंग्‍यूचाही एक रुग्ण आढळला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले.

सध्या शहरातील घराघरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. त्यातच कोरोनाने डोके वर काढले आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचे ७ रुग्ण आढळल्यानंतर शुक्रवारी ५ बाधित सापडले होते. त्‍यात शनिवारी आणखी ५ जणांची भर पडली. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी वाढली असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र सलग दुसऱ्या दिवशी ५ रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software