ओबीसी महामंडळाची थकीत व्याज दरात सवलत योजना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत (५० टक्‍के सूट) सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत (५० टक्‍के सूट) सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या जिल्हा कार्यालयामार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज वितरीत केले आहे. जिल्हा कार्यालयाकडून वाटप झालेल्या थकीत लाभार्थ्यांना महामंडळाकडून थकीत व्याज दरात (५० टक्‍के सूट) सवलत ३१ मार्च २०२५ पर्यंत देण्यात येणार आहे. या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कमेचा भरणा करून कर्ज खाते बंद करण्यासाठी जिल्हा कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, येथे भेट द्यावी अथवा दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४१५४४ वर संपर्क करण्याचे आवाहन‍ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. जिल्हा व्यवस्थापक राठोड यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड

Latest News

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपने अनिल मकरिये यांना बुधवारी (११ मार्च) उमेदवारी जाहीर...
अवघे छत्रपती संभाजीनगर शहरच ‘गॅस’वर!; घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई, ९२१ रुपयांचा सिलिंडर २ हजार रुपयांनी विकताहेत विक्रेते, प्रशासनाचे दावे फोल, दावे करण्यापेक्षा आता थेट टीम बनवून छापे मारा... शहरवासियांची मागणी!!
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software