घरी परतत असताना तलाठी लघुशंकेसाठी रस्त्यात थांबले, त्याचवेळी घडली धक्कादायक घटना..., सातारा परिसरात काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरी परतत असताना रस्त्यात थांबून लघुशंकेसाठी आडोशाला गेलेल्या तलाठ्याची दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याची घटना सोमवारी (२ डिसेंबर) रात्री ९ च्या सुमारास सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिंक रोडवर हॉटेल प्रभुच्याजवळ थांबली.

तलाठी ज्ञानेश्वर देवराव महालकर (वय ५४, रा. प्रियदर्शनी हौसिंग सोसायटी, सातारा परिसर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते जोगेश्वरीचे तलाठी आहेत. त्यांच्याकडे बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल (MH 20 GH5036) आहे. सोमवारी (२ डिसेंबर) सकाळी १० च्या सुमारास ते गंगापूर तहसील कार्यालयात निवडणुकीच्या कामासाठी गेले होते. ड्युटीवरून रात्री ७ ला घरी येण्यास निघाले. लिंक रोडवर हॉटेल प्रभुच्याजवळ असताना रात्री ९ ला ते लघुशंका आल्याने थांबले. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून चावी गाडीलाच ठेवून लघुशंका करण्यासाठी गेले. लघुशंका झाल्यानंतर ते गाडीकडे येत असतानाच एक जण अचानक त्यांच्या गाडीवर बसला आणि ५० हजार रुपयांची गाडी घेऊन धूम ठोकली. त्याच्यासोबत दुसऱ्या मोटारसायकलवर असलेले दोघेही जोरात निघून गेले. अधिक तपास पोलीस अंमलदार राहुल रणवीर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software