कल्पना, अशरफ अन्‌ डिम्पी तिघांचा सोबत देशात अनेक ठिकाणी प्रवास, उद्देश काय?, छत्रपती संभाजीनगरच्या कारवाईचा तपास आता देशपातळीवर सुरू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर), तिचा अफगाणी प्रियकर मोहम्मद अशरफ गिल (वय २४, ह. मु. जंगपुरा, नवी दिल्ली) व केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडींच्या नावाचा वापर करणारा तोतया अधिकारी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (वय ३०, रा. पालम, दिल्ली) यांनी अनेकदा राजस्थान, दिल्ली, मणिपूरमध्ये सोबत प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे. मोहम्मद अशरफचा भाऊ पाकिस्तानमध्ये राहतो. त्याला कल्पना आणि डिम्पीच्या मदतीने भारतात घुसखोरी करायची होती.

अशरफ व डिम्पीला दिल्लीत शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) तपास यंत्रणांनी अटक केली होती. त्यांना छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आले. दोघांना शनिवारी (२९ नोव्‍हेंबर) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कल्पना, डिम्पी व अशरफ देशात सोबत फिरले. त्यांनी काय कट रचला होता, मणिपूरला कशासाठी गेले होते, अशरफने कल्पनाला पैसे का दिले, याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. या सर्व घडामोडींदरम्यान दिल्लीत घातपात घडला. या घटनेशी डिम्पी, अशरफ, त्याचा पाकिस्तानमधील भाऊ गालिफ यांचा काही संबंध आहे का, याची चौकशी करण्याची आवश्यकता सरकारी वकिलांनी मांडली.

gil

अफगाणिस्तामध्ये २०१७ साली तालिबानी हल्ले होत असताना २६ लाखांहून अधिक अफगाण नागरिक विविध देशांमध्ये शरणार्थी म्हणून गेले. अनेक जण भारतातही आले. ते दिल्ली, नोएडा, हैदराबादमध्ये स्थायिक झाले. अशरफला ३ भाऊ, १ बहीण आहे. २०१७ मध्ये अशरफचे कुटुंब विस्थापित झाल्यावर तो एक भाऊ, बहिणीसोबत भारतात आला. एक भाऊ पाकिस्तानला गेला. आई व अन्य एक भाऊ अफगाणिस्तानमध्येच असतात. अशरफ दिल्लीत जंगपुरा भागात १२ हजार रुपये किरायाने ३ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतो. याच भागात अफगाणिस्तानचे बरेच शरणार्थी राहतात. पाकिस्तानमध्ये असलेल्या भावाला भारतात आणण्यासाठी अशरफ प्रयत्नरत होता. त्यातच त्याला कल्पना भेटली. नंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणारा तोतया डिम्पी भेटल्याचा घटनाक्रम जुळत आहे.

अल्पशिक्षित असलेला अशरफ देशभरातील प्रदर्शनात सुका मेव्याचा स्टॉल लावतो. २०२४ मध्ये शहरातील एसएफएस मैदानावरील प्रदर्शनातही त्याने स्टॉल लावला होता. तिथेच त्याची कल्पनाशी भेट झाली. त्यावेळी कल्पनाने त्याला आपण आयएएस असल्याचे सांगितले. दोघांत ओळख, मैत्री आणि भेटीगाठी वाढून प्रेम झाल्याचे सांगण्यात येते. एसएफएस मैदानावरील प्रदर्शनानंतर अशरफने मुंबईतील दोन मोठ्या प्रदर्शनांतही सुकामेव्याचा स्टॉल लावला होता. त्यावेळी कल्पना महिनाभर मुंबईत त्याच्यासोबत राहिली. डिम्पी हरजाई हा कायद्याचा पदवीधर आहे. तो अविवाहित असून, बांधकाम साहित्याचा पुरवठादार म्हणून काम करत होता. त्याची अनेक शासकीय कार्यालयांत ये-जा होती. तो आई, वडील, भावासह पालम परिसरात ३५० स्क्वेअर फुटांच्या घरात राहतो. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता कल्पनाची भेट धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचन सोहळ्याचे त्याने सांगितले.

पार्श्वभूमी...
कल्पना भागवत ६ महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी थांबल्याची गोपनीय माहिती सिडको पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी हर्सूलच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार, सहायक पोलीस निरीक्षक अरुणा घुले, वर्षा काळे यांच्यासह हॉटेलमध्ये जाऊन २२ नोव्‍हेंबरला कल्पनाला अटक केली. तिच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यातील अंमलदार सतीश बोर्डे यांनी तक्रार दिली आहे. कल्पनाने हॉटेलमध्ये थांबण्यासाठी जे आधारकार्ड दिले होते, त्यावर खाडाखोड केल्याचे दिसून आले होते. तिच्याकडे केंद्रीय लोकसेवा आयोगातील २०१७ ची यादीही तिच्याकडे मिळाली होती. ही यादीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना

Latest News

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software