पेट्रोलपंप टाकण्यासाठी वृद्धेकडून ४० लाख घेतले; दोन वर्षांत रुपयाही फेडला नाही; आता तिघांविरुद्ध गुन्हा!, छत्रपती संभाजीनगरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भारत पेट्रोलियमकडून मंजूर झालेला पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी वृद्धेकडून ४० लाख रुपये घेऊन त्यातील रुपयाचीही परतफेड न करणाऱ्या तिघांविरोधात अखेर सिटी चौक पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. जकिया बेगम अब्दुल्ला खान (वय ६७) असे या प्रकरणात फसवणूक झालेल्या वृद्धेचे नाव आहे.

जकिया बेगम आणि संशयित मिर्झा यास्मिन बेगम मिर्झा बिस्मिल्ला, बिस्मिल्ला बेग कय्युम बेग (दोघेही रा. डिलक्स अपार्टमेंट) आणि आजमत बेग कय्युम बेग (रा. बारापुल्ला गेट) हे एकाच वसाहतीमध्ये राहतात. त्यांची आधीपासून ओळख आहे. काही वर्षांपूर्वी जकिया बेगम यांच्या पतीच्या नावे असलेली रावसपुरा येथील जमीन संशयितांना पेट्रोलपंप टाकण्यासाठी देण्यात आली होती. हा पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी त्यांनी जकिया बेगम यांच्याकडून २०२३ मध्ये ५० लाख रुपये उधारीवर मागितले.

पेट्रोलपंप सुरू झाल्यानंतर अधिक रकमेचा परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखवले. यानंतर त्यांनी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी यासीन मिर्झा बँक खात्यावर १५ लाखांची रक्कम जमा केली, तर दोन मुलींच्या बँक खात्यातून आणखी २५ लाख रुपये आरोपींना दिले. या ४० लाख रुपयांत संशयितांनी पेट्रोलपंप सुरू केला. मात्र, नंतर वारंवार मागणी करूनही आरोपी जकिया बेगम यांना पैसे परत देण्यास टाळाटाळ करू लागले. वारंवार पैसे परत मागूनही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने अखेर जकिया बेगम यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आता या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software